agriculture news in Marathi silver lining was provided by agriculture Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेतीमुळे अर्थव्यवस्थेला झळाळी : आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

शेती क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रामुळे झळाळी मिळेल. उन्हाळी हंगामात वाढलेली पेरणी आणि चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे खरीप लागवडीत वाढ झाली आहे.

मुंबई: शेती क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांना लॉकडाउनचा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रामुळे झळाळी मिळेल. उन्हाळी हंगामात वाढलेली पेरणी आणि चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे खरीप लागवडीत वाढ झाली आहे. आगामी काळात महागाई किती वाढेल याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. मात्र कृषी क्षेत्र आशेचा किरण आहे, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी (ता.२२) स्पष्ट केले.

दास यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो दर कमी करण्याबरोबर सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. त्या मुदतीत वाढ केली आहे.

कोरोनाच्या संकट काळात रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे जाहीर केले. बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

दुसऱ्यांदा आरबीआयने निर्धारित वेळापत्रकापूर्वी रेपो दराची घोषणा केली. ६ जून रोजी पतधोरण जाहीर होणार होते. मात्र त्याआधीच व्याजदर कपात करुन बँकेने सामान्य कर्जदारांना दिलासा दिला. याआधी मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. आता आणखी तीन महिने म्हणजेच जून, जुलै आणि ऑगस्ट असे तीन महिने कर्जदारांची हप्त्यांमधून तात्पुरती सुटका होईल.

महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे. मात्र, पुढील तीन महिने महागाई कायम राहणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत ही महागाई कमी होईल, असे शक्तीकांत दास यांनी यावेळी सांगितले.

कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले होते. यात विविध क्षेत्रांना २० लाख कोटींची मदत योजनांमधून केली होती. लॉकडाऊनमुळे वस्तूंचा खप कमी झाला आहे. आता विक्रीला चालना देण्याची गरज दास यांनी यावेळी व्यक्त केली.

फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने जीडीपीच्या ३.२ टक्के निधी अर्थव्यवस्थेत उपलब्ध केला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभर उद्योगांची दिवाळखोरी आणि नादारी विधेयकातून सुटका केली असल्याचे त्यांनी सांगितले. निर्यात ३० वर्षातील निच्चांकी स्तरावर असल्याचे ते म्हणाले.
 

गव्हर्नर दास म्हणाले....

  • अर्थव्यवस्थेला केवळ शेती क्षेत्राकडून दिलासा 
  • कृषी क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांना मोठा फटका 
  • देशात उन्हाळी भात, कडधान्य आणि तेलबिया पिकांच्या पेरणीमध्ये चांगली प्रगती 
  • आतापर्यंत उन्हाळी लागवडीत ४३.५ टक्क्यांनी वाढ झाली 
  • २०१९-२० च्या रब्बी हंगामात बंपर उत्पादन 
  • सरकारकडून शेतमालाची विक्रमी खरेदी
  • रेपो दरात ०.४० टक्क्यांची कपात 
  • गृह, वाहन, औद्योगिक कर्जे स्वस्त होण्याची शक्यता 
  • तीन महिने कर्जदारांची हप्त्यांमधून तात्पुरती सुटका
  • पुढील तीन महिने महागाई कायम राहिल

इतर अॅग्रो विशेष
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून...औरंगाबाद ः कृषी निविष्ठा  विक्रेत्यांच्या...
सफरचंद झाडाला फळधारणा ! नाशिकच्या...नाशिक : जिल्हा फलोत्पादन व विविध प्रयोगात आघाडीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पडणाऱ्या...
एकाच आॅनलाइन अर्जावर कृषी योजनांचा लाभ...मुंबई  : कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
लातूर जिल्ह्यात पोलिसांनी बांधावर जात...लातूर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या...
न्यायालयाच्या भूमिकेनंतर गुणनियंत्रण...पुणे  : बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...
शेतकऱ्यांनो, एक वर्ष सुटी घ्यायची का?जगभरात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाइड/जीएम)...
...अन्यथा कृषी सहसंचालकांना अटक करून...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात...
`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेनानागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा...
काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा ...अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत...
नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात...नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला...
दुग्धोत्पादकांना लिटरमागे १० ते १२...नगर ः अनेक शेतकऱ्यांसह बेरोजगारीवर मात करण्यासाठी...
धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोरपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात...
अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमणपुणे ः खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच...
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का...नाशिक ः फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक...
देशात ९२ लाख हेक्टरवर कापूसमुंबई: देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे....
राज्यातील धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठापुणे : जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच...