सीना कोळगाव धरण अद्याप कोरडेच

सीना कोळगाव धरण अद्याप कोरडेच
सीना कोळगाव धरण अद्याप कोरडेच

सोलापूर : उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यांतील १० हजार २०० हेक्‍टर लाभक्षेत्र असलेले सीना नदीवरील सुमारे सहा टीएमसीचे कोळगाव धरण अद्यापही कोरडे आहे. निम्मा पावसाळा झाला तरी अद्याप या धरणक्षेत्रात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे हा भाग दुष्काळाच्या छायेत आहे. एकीकडे धरणे भरून लाखो लिटर पाणी दुसऱ्या राज्यात जात आहे. दुसरीकडे त्याच्याच शेजारील धरणात सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे पाण्याचा थेंबही नसल्याने संताप व्यक्त होत आहे. 

भीमा नदीची उपनदी असलेल्या सीना नदीवर नगर जिल्ह्यात निमगाव गांगर्डी हे एक व सोलापूर जिल्ह्यातील कोळगाव येथे दुसरे धरण आहे. या धरणात कुकडी प्रकल्पातून ओव्होर फ्लोचे पाणी सीना नदीत सोडल्यास येऊ शकते. उजनी धरणातूनही कोळगाव धरणापर्यंत पाणी येऊ शकते. याबाबत वारंवार शेतकऱ्यांनी मागणी करूनसुद्धा केवळ राजकारणाचा मुद्दा म्हणून याकडे पाहिल्याने पावसाळ्यात सुद्धा येथे टंचाईचा सामना करावा लागत आहे. 

सीना नदीत कुकडीतून पाणी सोडले, तर चोंडी येथून कोळगाव धरणासह सोलापूर जिल्ह्यातील संगोबा, पोटेगाव, तरटगाव व खडकी येथील बंधारे भरता येणार आहेत. याशिवाय मांगी तलावातून सुद्धा कोन्होळा नदीतून धरणात पाणी सोडता येऊ शकते. 

  • लाभक्षेत्र : उस्मानाबाद (परांडा) : ६८०० हेक्‍टर 
  • सोलापूर (करमाळा) : ३४०० हेक्‍टर 
  • साठवण क्षमता : ५ हजार ३९५ दलघफू   
  • असे येऊ शकते पाणी... 

    उजनी धरणातून दहिगाव योजनेद्‌वारे गुळसडी कॅनॉलमधून पांडे. तेथून ओढ्यातून पूर्ण दाबाने पाणी सोडल्यास थेट सीना कोळगाव धरणात. यामुळे म्हसेवाडी तलाव भरता येऊ शकतो. कुकडी प्रकल्पातून ओव्हर फ्लोचे पाणी मांगी येथील तळ्यात किंवा चोंडी येथून सीना नदीत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com