Agriculture news in marathi; 'Sindh Kheda' Plastic Culture in Agriculture ' | Agrowon

सिंदखेडराजात ‘प्लॅस्टिक कल्चर इन ॲग्रीकल्चर’
टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 जून 2019

बुलडाणा  ः बाष्पीभवन रोखण्यासोबतच तण नियंत्रणात पूरक ठरू पाहणाऱ्या प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर बुलडाणा जिल्ह्याचे सीड हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजा परिसरात वाढीस लागला आहे. त्यामुळेच प्लॅस्टिक कल्चर ईन ॲग्रीकल्चर असेही नवे संबोधन या भागात रूढ झाले आहे.

बुलडाणा  ः बाष्पीभवन रोखण्यासोबतच तण नियंत्रणात पूरक ठरू पाहणाऱ्या प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर बुलडाणा जिल्ह्याचे सीड हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंदखेडराजा परिसरात वाढीस लागला आहे. त्यामुळेच प्लॅस्टिक कल्चर ईन ॲग्रीकल्चर असेही नवे संबोधन या भागात रूढ झाले आहे.

 बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा परिसरात पारंपरिक पद्धतीने भाजीपाला बिजोत्पादन केले जाते. सुमारे ६ हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ढोबळी, मिरची, साधी मिरची, टोमॅटो, भेंडी, दोडकी, कारली यांसह इतर पिकांचे बिजोत्पादन शेतकरी करतात. आता शेतकऱ्यांव्दारे कापूस बिजोत्पादनही केले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील शेतकऱ्यांचे सातत्य असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी दिली. पिंपळगाव लेंडी, चांगेफळ, शेलगाव राऊत, सिंदखेडराजा, किनगावराजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, वर्दळी, सोनोशी, खैरखेड, पिंपरखेड, नशीराबाद, सावरगावमाळ या गावांनी बिजोत्पादनात मोठी आघडी घेतली आहे. 

बिजोत्पादक काही गावांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष राहते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा पर्याय मोठा आधार ठरला आहे. बाष्पीभवन कमी होते; तणाचा प्रादुर्भाव आणि कीड नियंत्रणाचा उद्देशही साधला जातो. परिणामी, शेतकऱ्यांव्दारे मल्चिंगचा वापर वाढीस लागला आहे. याची दखल घेत शासनाने अनुदानावर मल्चिंग देण्याकरिता पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे. विशेष म्हणजे बिजोत्पादनामुळे या भागातील अर्थकारणदेखील समृद्ध होण्यास मदत झाली आहे. नजीकच्या काळात कंपन्यांकडून वापरात असलेले हे मल्चिंग रिसायकलिंगकरिता घेतले जाते. त्यापोटी काही पैसेही दिले जातात.

देऊळगावराजा येथे कार्यरत असताना पहिल्यांदा मल्चिंगवरील पीक लागवडीला प्रोत्साहन दिले होते. बदलीनंतर बिजोत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंदखेडराजा तालुक्‍यातदेखील मल्चिंग वापराकरिता शेतकरी तयार केले. त्यामुळेच आज सहा हजार हेक्‍टरवर मल्चिंगचा वापर होत आहे. निश्‍चितच ही समाधानाची बाब आहे. शेतकऱ्यांना मल्चिंग वापराचे फायदे झाल्याने ते लागवडीसाठी याचा वापर करतात. 
- वसंत राठोड, तालुका कृषी अधिकारी, सिंदखेडराजा, जि. बुलडाणा.

इतर बातम्या
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...
मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक...नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट...
अकोल्यात पावसाळी वातावरणामुळे मूग...अकोला  ः गेल्या १५ दिवसांपासून कुठे रिमझिम...
ग्रामसेवकांच्या माघारीने...पुणे : राज्य शासनाकडून ग्रामसेवक संघटनेच्या...
हिंगोलीत खरिपात केवळ अकरा टक्के पीक...हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बॅंकांनी यंदा...
नरोटेवाडीतील कालव्यातून हिप्परगा...सोलापूर  : शिरापूर उपसा सिंचन योजनेमधून...
रेशीम अळ्यांचे शास्त्रोक्‍त संगोपन आवश्...जालना : ‘‘चॉकी रेअरिंग सेंटरमुळे शेतकऱ्यांना...
परभणीत ८४९ कोटी ५६ लाख रुपयांची...परभणी ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
लष्करी अळीच्या नुकसानीचे पंचनामे का...औरंगाबाद : ‘‘शेती तोट्यात गेली, गावचं अर्थकारण...
‘कडकनाथ’प्रकरणी ‘स्वाभिमानी’ आक्रमकसातारा : कडकनाथ घोटाळ्याप्रकरणी तिघांना आरोपीऐवजी...
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः...कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली,...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात सोडल्या...सांगली ः कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणांची चौकशी...
शरद पवार आजपासून राज्याच्या दौऱ्यावरमुंबई ः लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली पक्षाची...
मोकाट जनावरांकडून पिकांचे नुकसान विंग, जि. सातारा ः अतिवृष्टीने खरीप धोक्‍यात...
जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्गजायकवाडी, जि. औरंगाबाद : जायकवाडी धरणामधून...
थकबाकीदार सूतगिरणीच्या संचालकांवर राज्य...मुंबई: कोट्यवधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी राज्य...
रेशीम विभागाचा सुधारित आकृतीबंध...जालना: झपाट्याने वाढत असलेल्या रेशीम उद्योग व...
अमेरिकन लष्करी अळीकडून ४० टक्के मका फस्तपुणे: राज्यात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे...
लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभागपुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील...
अनुदान अर्जांच्या पूर्वसंमतीची पद्धत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी...