गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन लाखांवर चाकरमानी दाखल

सिंधुदुर्ग जिल्हा गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक चाकरमानी राज्याच्या विविध भागांतून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गणेशोत्सव सजावटीकरिता रानफुलांची मागणी वाढली आहे.
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन लाखांवर चाकरमानी दाखल
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन लाखांवर चाकरमानी दाखल

सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत असलेला सिंधुदुर्ग जिल्हा उत्सवासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक चाकरमानी राज्याच्या विविध भागांतून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गणेशोत्सव सजावटीकरिता रानफुलांची मागणी वाढली आहे. कोकणातील सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. या उत्सवाला आज (ता. १०) जल्लोषात सुरुवात होत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात लोक आले होते. परंतु यंदा तिपटीने लोक जिल्ह्यात आले आहेत. पावसाचा जोरदेखील कमी झाला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सिंधुदुर्गातील सर्व बाजारपेठा गजबजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गणेश सजावटीसाठी विविध रोषणाई, मखर बनविले जात असले तरी कोकणात पांरपरिक रानफुलांनी सजावट अनिवार्य मानली जाते. हरणाची फुले (सोंतळ), तेरडा, षडवाड (शेरवड), नागरखडी, याशिवाय काही रानफळेदेखील सजावटीसाठी वापरली जातात. अनेक लोक आता ही फळे, फुले बाजारात विक्री करतात. लाखो रुपयांची उलाढाल यापासून होते. बाजारात सध्या ही फळे, फुले खरेदीसाठी झुंबड असल्याचे दिसून येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com