agriculture news in marathi Sindhudurg District awaiting for Ganesh festival | Page 2 ||| Agrowon

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन लाखांवर चाकरमानी दाखल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021

सिंधुदुर्ग जिल्हा गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक चाकरमानी राज्याच्या विविध भागांतून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गणेशोत्सव सजावटीकरिता रानफुलांची मागणी वाढली आहे.

सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत असलेला सिंधुदुर्ग जिल्हा उत्सवासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंत तीन लाखांहून अधिक चाकरमानी राज्याच्या विविध भागांतून जिल्ह्यात दाखल झाले आहेत. गणेशोत्सव सजावटीकरिता रानफुलांची मागणी वाढली आहे.

कोकणातील सर्वांत मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. या उत्सवाला आज (ता. १०) जल्लोषात सुरुवात होत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे जिल्ह्यात खूप कमी प्रमाणात लोक आले होते. परंतु यंदा तिपटीने लोक जिल्ह्यात आले आहेत. पावसाचा जोरदेखील कमी झाला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून सिंधुदुर्गातील सर्व बाजारपेठा गजबजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गणेश सजावटीसाठी विविध रोषणाई, मखर बनविले जात असले तरी कोकणात पांरपरिक रानफुलांनी सजावट अनिवार्य मानली जाते. हरणाची फुले (सोंतळ), तेरडा, षडवाड (शेरवड), नागरखडी, याशिवाय काही रानफळेदेखील सजावटीसाठी वापरली जातात. अनेक लोक आता ही फळे, फुले बाजारात विक्री करतात. लाखो रुपयांची उलाढाल यापासून होते. बाजारात सध्या ही फळे, फुले खरेदीसाठी झुंबड असल्याचे दिसून येते.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...