सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे ५० टक्के नुकसान

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे ५० टक्के नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे ५० टक्के नुकसान

सिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सुपारी बागायतदारांना फळगळीच्या समस्येला सामोरे जावे लागले. सुपारी बागायतदारांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मात्र या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात  भातपीक, आंबा, काजूप्रमाणेच सुपारीच्या बागांना फटका बसला आहे. जुलै, ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली. त्यानंतर पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपर्यत सतत पाऊस झाला. परिणामी सुपारी बागांना बुरशीने ग्रासले. या कालावधीत फळगळीच्या मोठ्या समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. झाडांच्या खाली फळांचा खच पडला. 

सुपारीला पिकाला शासनाकडून नुकसानभरपाई मिळत नाही. सुपारीचा समावेश फळझाडे, भाजीपाल्यांमध्ये नाही. त्यामुळे त्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात किनारपट्टीच्या गावांमध्ये सुपारीचे पीक घेतले जाते. अनेक शेतकरी नारळांच्या झाडांमध्ये आंतरपीक म्हणून सुपारीचे पिक घेतात. सांवतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळ या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीची लागवड आहे. इतर तालुक्यांमध्ये सुध्दा काही प्रमाणात हे पीक घेतले जाते. 

सांवतवाडी तालुक्यात साधारणपणे ४५९ हेक्टर क्षेत्र सुपारी लागवडीखाली आहे. येथील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावरच आहे. परंतु यावर्षी नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. अवेळी फळगळ झालेल्या सुपारीचा काहीही उपयोग होत नाही. फळ तयार असेल, तरच त्याला अपेक्षित दर मिळतो. तत्पुर्वी फळ गळून पडले, तर शेतकऱ्यांना २० टक्के सुद्धा दर मिळत नाही.

सुपारीची १३०० झाडे आहेत. यातून दरवर्षी साधारणपणे चार-पाच लाख रुपये उत्पन्न मिळते. परंतु या वर्षी ५० टक्के रक्कम सुद्धा मिळणार नाही. फळे तयार होण्यापूर्वीच गळून पडली आहेत. शासनदफ्तरी सुपारीची फळ म्हणून नोंद नसल्यामुळे नुकसानभरपाई मिळत नाही. त्यामुळे सुपारीची शासनाने फळ म्हणून नोंद करणे आवश्‍यक आहे. - गोंविद बांदेकर,  सुपारी बागायतदार, सावंतवाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com