सिंधुदुर्ग जिल्ह्यात एसआरआय`ने होणार १८० हेक्टरवर भात लागवड

एसआरआय पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ होताना दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा एसआरआय पद्धतीने लागवड केल्यास तिप्पट उत्पन्न होते. याशिवाय बियाणेदेखील कमी लागते. - एस. एन. म्हेत्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग.
 In Sindhudurg district, SRI will cultivate paddy on 180 hectares
In Sindhudurg district, SRI will cultivate paddy on 180 hectares

सिंधुदुर्ग : राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात १८० हेक्टर क्षेत्रावर अधिक उत्पन्न देणाऱ्या एसआरआय पद्धतीने भात लागवड करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९०० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना २ हजार २०० क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

सिंधुदुर्गात सुमारे ५५ हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. खरीप हंगामात भात लागवड हेच जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. परंतु, अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने भातशेती करतात. त्यामुळे उत्पन्नात म्हणावी तशी वाढ होत नाही. त्यामुळे कमी जागा, कमी बियाणे आणि अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या एसआरआय पद्धतीचा प्रसार व्हावा, शेतकऱ्यांपर्यंत ही पद्धत पोचावी, या हेतूने राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८० हेक्टरवर या पध्दतीने भात लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यासाठी जिल्ह्यातील ९०० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना २ हजार २०० किलो भात बियाणे देण्यात आले आहे. 

पांरपरिक पद्धतीने भातलागवड केल्यास हेक्टरी ४० किलो भातबियाणे लागते. तर, एसआरआय पद्धतीत फक्त १२ किलो बियाण्यांची गरज भासते. देवगड, मालवण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यात प्रत्येकी १२० शेतकरी, तर वैभववाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यात प्रत्येकी १०० शेतकरी श्री. पद्धतीने भात लागवड करतील. देवगड-२४ हेक्टर, वैभववाडी-२०, मालवण-२४, कुडाळ-२४, सावंतवाडी-२४, कणकवली-२४, दोडामार्ग-२०, वेंगुर्ला-२० असे एकूण १८० हेक्टरवर भात लागवड करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com