Agriculture news in marathi, In Sindhudurg, hundreds of acres of paddy fields are destroyed | Agrowon

सिंधुदुर्गात शेकडो एकर भातशेती कुजली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी परिसरातील २० हून अधिक गावांतील  शेकडो एकर भातशेती सलग सात ते आठ दिवस पुराच्या पाण्याखाली राहिली. त्यामुळे ती कुजली आहे. या नुकसानीचे अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. 

सिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी परिसरातील २० हून अधिक गावांतील  शेकडो एकर भातशेती सलग सात ते आठ दिवस पुराच्या पाण्याखाली राहिली. त्यामुळे ती कुजली आहे. या नुकसानीचे अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. 

तीन ते सात ऑगस्ट या कालावधीत सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झाला. नदीनाल्यांना आलेला पूर आणि समुद्राला आलेले उधाण, यामुळे खाडीकिनाऱ्यांलगतच्या गावांना पुराचा मोठा तडाखा बसला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि देवगड तालुक्यातील काही गावे खाडीकिनाऱ्याला आहेत. यामध्ये खारेपाटण, विजयदुर्ग, वाघोटन, मुटाट, गिर्ये, मणचे, मालपे, पोंभुर्ले, धालवली, कोर्ले, कुणकवण, सोनाली, शेर्पे; तर राजापूर तालुक्यातील तारळ, नाणार, कुंभवडे, पालये, प्रिंदावण, बांदीवडे, वाल्ये, शेजवली या गावांचा समावेश आहे. या गावांतील शेकडो शेतकऱ्यांच्या भातशेतीचे पुरामुळे नुकसान झाले. 

दरम्यान, या भागात कमी हळवी पिके घेतली जातात. १०० दिवसांची पिके घेत असल्यामुळे सध्या ती फुलोरा येण्याच्या स्थितीत होती. पूर येण्यापूर्वी हिरवागार दिसणारा हा भातशेतीचा परिसर आता बकास दिसत आहे. कुजलेल्या भातशेतीच्या काड्यांचे अवशेषच फक्त दिसत आहेत. हे ओसाड चित्र पाहून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे दुःख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

वर्षभर लागणारे धान्य हे शेतकरी या शेतजमिनीतून पिकवित असतात; परंतु सर्वच पीक वाया गेल्यामुळे आता काय करावे, या विवंचनेत ते आहेत. पूर ओसरल्यानंतर सहा दिवस उलटले तरीही शेकडो एकर भातशेती कुजलेल्या परिसराकडे फिरकण्यास प्रशासकीय यंत्रणेला वेळ मिळालेला नाही. कुणीही प्रशासकीय अधिकारी आणि कृषी अधिकारी आजमितीस या भागात आलाच नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामेदेखील झालेले नाहीत. पंचनामे होऊन नुकसानभरपाई  कधी मिळणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
 


इतर ताज्या घडामोडी
दापोली कृषी विद्यापीठातर्फे बांधावर...रत्नागिरी ः दापोली कृषी विद्यापीठाच्या विस्तार...
अकोल्यात कोरोना बाधितांची संख्या...अकोला ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३७ हजार क्विंटल...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात ३६ हजार...
मालेगाव बाजार समितीची मुख्यमंत्री...वाशीम ः कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्यास मदत...
भंडारा जिल्ह्यात ५० हजारांवर मजुरांना...भंडारा ः लॉकडाऊन काळात आर्थिक आधार म्हणून...
अकोल्यात अकरा कोटींच्या निविष्ठा...अकोला ः आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावर...
खानदेशातील टंचाईग्रस्त भागात बऱ्यापैकी...जळगाव : खानदेशात टंचाईच्या झळा बसणाऱ्या धुळ्यातील...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...जळगाव ः खरीप हंगाम तोंडावर आल्याने...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
परभणीत सोयाबीन बियाण्यांचे नापासाच्या...परभणी  ः सोयाबीनमध्ये बियाणे नापासाचे प्रमाण...
अटीशर्तीविना मका खरेदी करा खासदार डॉ....नाशिक : केंद्र सरकारच्या आधारभूत किंमत खरेदी...
शेतकऱ्यांनो कृषी निविष्ठांची पावती...नांदेड : शेतकऱ्यांनी येत्या खरीप हंगामासाठी खते,...
जालन्यात १२ हजारावर शेतकऱ्यांनी तपासली...जालना : कृषी विभागातर्फे जिल्ह्यात एकाच दिवशी...
नगर जिल्ह्यात ९३ टॅंकरव्दारे पाणीपुरवठानगर  ः नगर जिल्ह्यात उन्हाची तीव्रता...
नगर, पारनेर, नेवासेत कांदा लिलाव बंदचनगर  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
नांदेड जिल्ह्यात ७० हजार क्विंटलवर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतंर्गंत...
अंबडमध्ये कापूस खरेदीसाठी दोन...अंबड, जि. जालना : येथील मे सुरज ॲग्रोटेकच्या...
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...