सिंधुदुर्गात ५० टक्केच पीक कर्जवाटप

सिंधुदुर्गात ५० टक्केच पीक कर्जवाटप
सिंधुदुर्गात ५० टक्केच पीक कर्जवाटप

सिंधुदुर्ग : ‘‘सिंधुदुर्गात खरीप हंगामासाठी उद्दिष्टांच्या ५० टक्केच कर्जवाटप झाले आहे. आतापर्यत १८ हजार ५९२ शेतकऱ्यांना १३५ कोटी ५० लाख रुपयांचे पीक कर्जाचे वितरण करण्यात आले. चालु वर्षासाठी शेतकऱ्यांना २७१ कोटी १२ लाख रूपये कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी विभागाचे जिल्हा समन्वयक अरुण नातू यांनी दिली.

खरीप हंगामासाठी गतवर्षी ४२ हजार ५५० शेतकऱ्यांना २४९ कोटी १० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. चालु वर्षासाठी शासनाने विविध सहकारी सोसायट्या, जिल्हा बँक, राष्ट्रीय व ग्रामीण बँकाना २७१ कोटी बारा लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले. हंगाम येऊन दोन महिने उलटले. परंतु जुलैअखेरपर्यंत केवळ ५० टक्के कर्जवाटप झाले आहे. 

सिंधुदुर्ग बँकेला ९४ कोटी १७ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी १४ हजार शेतकऱ्यांना ६५ कोटी ९० लाखांचे पीककर्ज वितरीत केले. राष्ट्रीय बँकांनी १५५ कोटी ५७ लाखांपैकी ३ हजार ६९० शेतकऱ्यांना ५८ कोटी १० लाखांचे पीककर्ज दिले. ग्रामीण बँकांनी ८ कोटी ४१ लाखांपैकी ७५३ शेतकऱ्यांना ७ कोटी ५० लाख रुपयांचे पीककर्ज दिले. इतर बँकानी १२ कोटी ९७ लाखांपैकी १४९ शेतकऱ्यांना ४ कोटी १० लाखांचे वाटप केले.

कर्ज वितरणांसाठी सप्टेंबरअखेरपर्यंत मुदत असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्हयात ७८ हजार शेतकरी आहेत. केवळ ४४ हजार शेतकरी सहकारी संस्थाचे सभासद आहेत. पीककर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सहकारी सोसायट्यांचे सभासद असणे अनिवार्य आहे. जे शेतकरी सोसायट्याचे सभासद नाहीत, त्यांनी सदस्य व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com