सिंधुदुर्गात संततधार थांबली, भातलावणीला वेग

सिंधुदुर्गात संततधार थांबली, भातलावणीला वेग
सिंधुदुर्गात संततधार थांबली, भातलावणीला वेग

सिंधुदुर्ग ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेली संततधार थांबली आहे. सोमवारी (ता. १) सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू असून, पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. पावसाने उसंत दिल्यामुळे पाणथळीच्या जमिनी नांगरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. चांगला पाऊस झाल्यामुळे भातरोपे लावणीच्या कामांना गती आली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघुसिंचन धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे.

मुसळधार पावसाने जिल्ह्याला मागील चार दिवसांत झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. नदी-नाल्यांनी पूररेषा ओलांडल्यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. दरम्यान, रविवारीपासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरवात झाली. रात्री तास-दोन तासांच्या फरकाने पावसाच्या मोठ्या सरी कोसळत होत्या. परंतु, सकाळपासून पावसाने उसंत घेतली आहे. ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत. पावसाने उसंत घेतल्यामुळे पाणथळीच्या जमिनीची नांगरणी शेतकऱ्यांनी हाती घेतली आहे. तर, दुसरीकडे भातरोपे लावणीच्या कामाला गती आली आहे. गावागावांत भात लावणी सुरू आहे.

जिल्ह्यातील तिलारी विद्युत प्रकल्पात ८५.४१० दलघमी, तिलारी आंतरराज्यीय दोडामार्ग प्रकल्पात ४४७.३६९ दलघमी पाणीसाठा झाला आहे. तर, देवधर मध्यम प्रकल्पात ९८ दलघमी, अरुणा प्रकल्पात ४६.७०७ दलघमी, कोर्ले सांतडी प्रकल्प -२५.५६४ दलघमी पाणीसाठा झाला आहे. याशिवाय लघु प्रकल्पांमध्ये देखील चांगला पाणीसाठा झाला आहे.

लघुसिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा (दलघमीमध्ये) : शिवडाव-२.६४, नाधवडे ४.३६, ओटाव-४.६८, देंदोनवाडी-९.८०, तरदंळे-४.५५, आडेली-१.२८, आंबोली-१.७२, चोरगेवाडी-३.२०, हातेरी-१.९६, माडखोल-१.६९, निळेली-१.७४, ओरोस बुद्रुक-२.४०, सनमटेंब-२.३९, तळेवाडीडिगस-२.५०, दाभाचीवाडी-२.४२, पावशी-३.३०, शिरवल-३.६८, पुळास-१.५०, वाफोली २.३३, कारीवडे-१.३८, धामापूर-२.४४, हरकुळ-२.३८, ओसरगाव-१.३३, ओझरम-१.८१, पोईप-१.१६, शिरगाव-१.५८, तिथवली-१.७२, लोरे-२.६९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com