सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के पावसाची नोंद

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ५३२ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वैभववाडी तालुक्यात ४६१२ मिमी इतकी झाली आहे.
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के पावसाची नोंद Sindhudurg receives 90% of average rainfall
सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के पावसाची नोंद Sindhudurg receives 90% of average rainfall

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ५३२ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वैभववाडी तालुक्यात ४६१२ मिमी इतकी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४५०० मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १ जून ते १ नोव्हेंबर या कालावधीतील पावसाचे मोजमाप केले जाते. या वर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर २० जूननंतर पावसाचे प्रमाण वाढले. जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. १२ जुलै ते २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील चांगला पाऊस झाला. सप्टेंबर अखेरला सरासरी ३९०९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. परतीचा पाऊस जिल्ह्याच्या सर्व भागात कोसळला. त्यामुळे बहुतांशी तालुक्यात पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात १ जून ते १६ ऑक्टोबरपर्यंत सरासरी ४०५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात ४६१२ मिमी इतका झाला आहे. सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात ३२६४ मिमी इतका झाला आहे. गेल्या वर्षी १ जून ते १६ ऑक्टोबरपर्यंत ४५८४ मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी ४०५२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ५३२ मिमी पाऊस कमी झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com