Agriculture News in Marathi Sindhudurg receives 90% of average rainfall | Agrowon

सिंधुदुर्गमध्ये सरासरीच्या ९० टक्के पावसाची नोंद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021


सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ५३२ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वैभववाडी तालुक्यात ४६१२ मिमी इतकी झाली आहे. 

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आतापर्यंत ४०५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत ५३२ मिमी पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद वैभववाडी तालुक्यात ४६१२ मिमी इतकी झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४५०० मिमी पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात १ जून ते १ नोव्हेंबर या कालावधीतील पावसाचे मोजमाप केले जाते. या वर्षी जुनच्या पहिल्या आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर २० जूननंतर पावसाचे प्रमाण वाढले. जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. १२ जुलै ते २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील चांगला पाऊस झाला.

सप्टेंबर अखेरला सरासरी ३९०९ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विजांच्या गडगडाटांसह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. परतीचा पाऊस जिल्ह्याच्या सर्व भागात कोसळला. त्यामुळे बहुतांशी तालुक्यात पावसाने सरासरी गाठली. जिल्ह्यात १ जून ते १६ ऑक्टोबरपर्यंत सरासरी ४०५२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात ४६१२ मिमी इतका झाला आहे. सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात ३२६४ मिमी इतका झाला आहे.

गेल्या वर्षी १ जून ते १६ ऑक्टोबरपर्यंत ४५८४ मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी ४०५२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ५३२ मिमी पाऊस कमी झाला आहे.


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...