सिंधुदुर्गात तीन हजार ४५९ व्यक्तींची तपासणी ः डॉ. चाकुरकर

In Sindhudurg three thousand 459 people were examined: Dr. Chakurkar
In Sindhudurg three thousand 459 people were examined: Dr. Chakurkar

सिंधुदुर्ग : ‘‘कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ हजार ४५९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यातील ५२ जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात आयसोलेशन वॉर्डसाठी एकूण १०६ बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. गरज भासल्यास त्यामध्ये वाढ करण्यात येईल’’, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली.

डॉ. चाकुरकर म्हणाले, ‘‘कोरोनाचा एक रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्यानंतर जिल्हा प्रशासन आणखीनच सतर्क झाले आहे. जिल्ह्यात परदेशातून किंवा अन्य भागातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ हजार ४५९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १५१ परदेशी आहेत. तर, पोलिस तपासणी नाक्यावर आत्तापर्यंत ३२४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ५२ व्यक्ती निरीक्षणाखाली आहेत. त्यातील ७ जणांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.’’ 

‘‘खबरदारीचा उपाय म्हणून ओरोस आयटीआय येथे ६४, मालवण १०, सावंतवाडी १०, वेंगुर्ला १०, कणकवली १० अशा एकूण १०४ ठिकाणी क्वारंटाईनची सोय केली आहे. आयसोलेशन वॉर्डसाठी जिल्हा रुग्णालय ५०, उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालय येथे २०, तर खासगी रुग्णालयांमध्ये ३६ बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे,’’ असेही डॉ. चाकुरकर म्हणाले. 

खासगी बसेसचे थांबे निश्‍चित

खासगी वाहनांमधील प्रवाशांची तपासणी करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या उपस्थितीत खासगी बसचालक, मालकांची बैठक घेण्यात आली. त्यात खासगी आराम बससाठी थांबे निश्‍चित करण्यात आले आहेत. याशिवाय महत्त्वाचा सूचना देण्यात आल्याचेही चाकुरकर यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com