Agriculture news in Marathi Sindhudurg on the threshold of predestination | Page 2 ||| Agrowon

सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा पूरस्थितीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अनेक भागांतील भातरोपे, ऊसशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग अजूनही पाण्याखाली असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा पूरस्थितीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अनेक भागांतील भातरोपे, ऊसशेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. जिल्ह्यातील अनेक मार्ग अजूनही पाण्याखाली असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. बांदा आणि खारेपाटणला पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १६) रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. मात्र सकाळी दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बुधवारी रात्रभर जिल्ह्यात संततधार सुरू होती. त्यानंतर दिवसभर पाऊस सुरू होता. मंगळवारीदेखील मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाचा जोर अधिकच वाढला. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग पाण्याखाली गेले आहेत. तेरेखोल नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे बांदा शहराला पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. तर खारेपाटणमध्ये देखील पुराच्या पाण्यात वाढ होत आहे. त्यामुळे खारेपाटणला देखील पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

या भागातील चिंचवली, तिथवली या भागांतील कित्येक एकर ऊसशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातील पावशी (ता. कुडाळ) परिसरातील भातरोपे पाण्याखाली गेली आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी पाऊस उघडीपदेखील देत आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दीड महिन्यांत धरणांत ३७३ टीएमसी...पुणे : राज्यातील बहुतांश भागात जुलैमध्ये पावसाने...
हजारो नुकसानग्रस्त दाव्यापासून वंचित नांदेड : अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे...
कोल्हापुरात पुराचे पाणी ओसरू लागले कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली...
राज्याची फळबाग लागवड योजना बंद नगर ः फळबागेचे क्षेत्र वाढीसाठी राज्यात सध्या...
विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेतीदेवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील,...
हिंमत, परिश्रमातून पूर्णाबाईंनी साधली...शिरेगाव (जि. नगर) येथील अल्पभूधारक पूर्णाबाई होन...
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...