सिंदखेड बनले बुलडाणा जिल्हा स्मार्ट ग्राम

सिंदखेड लपाली गावाला जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी घोषित केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते या गावकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामुळे गावाला ४० लाखांचा पुरस्कार मिळणार आहे.
Sindkhed became Buldana district smart village
Sindkhed became Buldana district smart village

बुलडाणा ः जिल्ह्यातील सिंदखेड लपाली गावाला जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी घोषित केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते या गावकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यामुळे गावाला ४० लाखांचा पुरस्कार मिळणार आहे.

यापूर्वी जिल्ह्यातील तेरा तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामची निवड करून जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्रामसाठी तपासणी पूर्ण करण्यात आली. जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामसाठी तेरा गावांमध्ये चुरस निर्माण झाली होती. यात सिंदखेड गावाने बाजी मारली. या गावाला तालुकास्तराचा १० लाखांचाही पुरस्कार मिळाला आहे. एकूण ५० लाख रुपये मिळणार आहेत. मोताळा तालुक्यातील या गावाने सरपंच, सदस्य, सचिव आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने विविध उपक्रम राबवून हा पुरस्कार मिळला.

यापूर्वी सिंदखेड गावाने एकीच्या जोरावर सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय बक्षीस मिळवून जिल्ह्याचे नाव राज्यात नेले होते. स्मार्टग्राम स्पर्धा निकषावर आधारित विकास कामे करण्यात आली होती. विविध कामाच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याचा एक स्वच्छ प्रयत्न सिंदखेड गाव यशस्वी झाले. पाणी पुरवठा, आरओ प्लॅंट, वृक्ष लागवड, करवसुली, शौचालय सुविधा, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व्यवस्थापनएलबीएस, कांटुर बंडींग, कंपार्टमेंट बंडीग, गाबियान अशी कामे करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com