सिन्नर, संगमनेरसाठी ‘भोजापूर`चे आवर्तन उद्या सुटणार

सिन्नर, संगमनेरसाठी ‘भोजापूर`चे आवर्तन उद्या सुटणार
सिन्नर, संगमनेरसाठी ‘भोजापूर`चे आवर्तन उद्या सुटणार

सिन्नर, जि. नाशिक : भोजापूर धरणातून सिन्नर व संगमनेर तालुक्यांच्या लाभक्षेत्रातील गावांना पिण्याच्या पाण्यासह रब्बी पिकांसाठी बुधवारी (ता.२८) उजवा व डावा अशा दोन्ही कालव्यांद्वारे आवर्तन सोडण्यात येणार आहे. कडवा विश्रामगृह येथे शुक्रवारी (ता. २३) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. धरणातून एकूण १२० दलघफू पाणी सोडले जाणार आहे.

आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता सोमनाथ गोंदकर, शाखा अभियंता बोडके, बी. के. अचाट, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, उपसरपंच शरद शेळके, दीपक बर्के, संगमनेर तालुक्याचे प्रतिनिधी हरिश चकोर, बी. आर. चकोर, 'पाणी वापर'चे प्रतिनिधी श्याम उगले, भागवत घुगे उपस्थित होते.

आवर्तनाची पूर्वतयारी म्हणून कालवा व पोटचाऱ्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा, त्यानंतरच रब्बीचे आवर्तन सोडावे, असे वाजे यांनी अधिकाऱ्याना सांगितले. आवर्तन सुरळीत चालण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, गुन्हे दाखल करण्यासारखे प्रसंग उभे करून नये, असे आवाहनही त्यांनी केले. यापूर्वीच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली. दुरुस्तीचे कामे लांबल्यास आवर्तनदेखील एखाद-दोन दिवस लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. आवर्तन सुटल्यानंतर पाण्याची मागणी केल्यास ते देण्याची मागणी मान्य करण्यात आली.

तथापि, पिण्याचे व शेतीचे पाणी एकत्रित सोडण्यात येणार आहे. कालव्याद्वारे शेतीला पाणी जाऊ द्यायचे, गाव शिवारातील बंधाऱ्यांमध्ये पाणी साठविण्याबाबतचा निर्णय शेतकऱ्यांवर सोडण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com