भरघोस मदत मिळेल असं काही तरी करा : केंद्रीय पथकाकडे शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. आता केंद्र शासनाने भरीव मदत जाहीर करावी. सोयाबीन, मका पिकाचे ७५ टक्के नुकसान झाले आहे. ऑनलाइन पीकविमा भरला असून, ठोस भरपाई मिळायला हवी. पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या कृषी विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता केली. केंद्रीय पथकाने शेतात पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला; मात्र शासनाकडून भरीव मदत कधी मिळेल, हा प्रश्न आमच्यासमोर आहे. - चंद्रकला गायकवाड, महिला शेतकरी, दिघी.
`Sir, do something that will be of great help` : Farmers have expressed their concerns to the Union Squad.
`Sir, do something that will be of great help` : Farmers have expressed their concerns to the Union Squad.

नगर : दोन वर्षे दुष्काळ सोसला, आता कुठं बरं झालं होतं. त्यात जास्त पाऊस पडला आणि हातची पिके गेली. पीक विमा भरला पण त्याची भरपाई मिळत नाही. सोयाबीन, मका ही पिके पुरती वाया गेली. साहेब, शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळेल असं करा, अशा भावना व्यक्त करीत शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर झालेल्या नुकसानीच्या व्यथा मांडला. 

पावसामुळे श्रीरामपुर तालुक्यातील दिघी येथे झालेल्या नुकसानीची केंद्रीय पथकाचे प्रतिनिधी दिनानाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांनी पाहणी करून आढावा घेतला. पथकाने दिघी येथील रखमाजी यशवंत पठारे यांच्या शेतातील मक्‍याची, चंद्रकला गायकवाड यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी करून माहिती घेतली. 

सुमनबाई हांडे यांच्या शेतातील सोयाबीनचे पावसाने मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या शेतातील नुकसानीची दिनानाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, विभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार प्रशांत पाटील, राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी अशोक साळी आदींसह प्रशासनाचे अधिकारी पथकासमवेत होते. 

पथकातील सदस्यांचे रविवारी (ता.२४) सकाळी शिर्डी येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांनी ११ वाजता दिघी गावाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर हे पथक बाभळेश्वरमार्गे संगमनेर तालुक्‍यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. पावसामुळे जिल्ह्यात सुमारे ४५० कोटींचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या नुकसानीची माहिती पथकाला देण्यात आली. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांची नियुक्ती करून पंचनामे वेळेत पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी पथकाला दिल्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com