जिगाव प्रकल्पग्रस्तांसाठी १ सप्टेंबरपासून ठिय्या आंदोलन ः डॉ. कुटे

जिगाव प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या न सुटल्यास, बहुचर्चित नमुना ‘ड’ मंजूर न झाल्यास आपण स्वतः एक सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहे,’’ असा इशारा आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिला.
Sit-in agitation for Jigaon project victims from September 1: Dr. Kute
Sit-in agitation for Jigaon project victims from September 1: Dr. Kute

बुलडाणा  : ‘‘जिगाव प्रकल्प हा बुलडाणा जिल्हावासियांसाठी महत्त्वाचा विषय आहे. जिगाव प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या न सुटल्यास, बहुचर्चित नमुना ‘ड’ मंजूर न झाल्यास आपण स्वतः एक सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहे,’’ असा इशारा आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिला.

डॉ. कुटे म्हणाले, ‘‘सरकारच्या धोरणानुसार जिगाव धरणाममध्ये २० टक्के पाणीसाठा साठविण्याचे नियोजन सुरू आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील २२ गावांचे पुनर्वसन होणार आहे. त्यासाठी जमीन भूसंपादनाची कारवाई सुरू आहे. नवीन भूसंपादन कायद्यानुसार कलम ११ लागल्यानंतर मोबदला देण्याची कार्यवाही दोन वर्षात देणे बंधनकारक आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. प्रकल्पातील मानेगाव, हिंगणे (बाळापूर), दादूलगाव, माहुली, कालवड, येरठी, भोच या गावांची निवड ही अंतिम टप्प्यात असून नमुना ‘ड’ मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना फार मोठा अन्याय होणार आहे.’’

आजपर्यंत ज्या निवडी झाल्या, त्यापैकी बेलाड, पाटोदा या गावांचा नमुना ‘ड’ मंजूर घेऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला. परंतु, इतर गावांकडे प्रशासन दुजाभाव करताना दिसत आहे. कलम ११ लागल्यानंतर शेतकऱ्यांना आक्षेप घेण्याचा अधिकार असतो. त्यावर मोका पाहणी करून नमुना ‘ड’ बनतो. परंतु, तो अधिकारच हिसकावून घेऊन काही अधिकारी मनमानी करीत आहेत, असेही कुटे म्हणाले. 

पालकमंत्री असताना नमुना ‘ड’ मान्य करणारे अधिकारी मात्र आज चालढकल करीत आहेत. या विषयांवर आयुक्तांसोबत चर्चा करून मार्गदर्शन घेतो, असे बोलून वेळ मारून नेण्याचे प्रकार सुरू आहे, अशी खंतही कुटे यांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com