agriculture news in Marathi site of solar pump application stopped Maharashtra | Agrowon

‘सौर कृषिपंपा’चा लक्ष्यांक संपल्याने संकेतस्थळ बंद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. लक्ष्यांक केव्हाच संपल्याने योजनेचे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

पुणे : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. लक्ष्यांक केव्हाच संपल्याने योजनेचे संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. 

वीजटंचाई, रात्रीच्या वेळी होणारा विजेचा पुरवठा यामुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंप आता जास्त सोयीचा वाटतो. यंदा चांगल्या मॉन्सूनमुळे राज्यभरातील जलाशये भरलेली असून, पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे सौरपंप बसविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अजून वाढते आहे. मात्र या स्थितीत सौर कृषिपंप योजनेसाठी अर्ज करता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बहुतेक शेतकरी अनुदानाची वाट न बघता स्वखर्चाने सौरपंप बसवत आहेत.

 १.१० लाख कोटेशन वाटले
‘महावितरण’च्या म्हणण्यानुसार, या योजनेसाठी केवळ एक लाख पंप वाटले जाणार होते. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले असता दोन लाख चार हजार शेतकऱ्यांचे अर्ज आले. मागणीच्या दुप्पट अर्ज आल्याने पेच तयार झाला होता. अर्थात, काटेकोर छाननीमध्ये निकषात बसत नसल्याच्या मुद्द्यावर ६८ हजार अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरित अर्जांमधून एक लाख १० हजार शेतकऱ्यांना सौरपंपासाठी कोटेशन वाटण्यात आलेले आहे.

‘‘कोटेशन दिलेल्या शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न ‘महावितरण’चा आहे. ही योजना पूर्वी तीन टप्प्यांत होती. पहिला टप्पा २५००० कनेक्शनचा, दुसरा ५० हजारांचा, तर तिसरा २५ हजारांचा होता. मात्र दुसरा व तिसरा टप्पा आता एकत्र करण्यात आलेला आहे. तीन एचपी व पाच एचपीचे काम संपले आहे. आता फक्त साडेसात एचपीचे साडेसात हजार सौरपंप बसविण्याचे काम सुरू आहे. लक्ष्यांक संपल्यामुळे संकेतस्थळ काही महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांनी इतर पर्याय शोधावे. कारण, केंद्र किंवा राज्य शासनाकडून नव्याने लक्ष्यांक आल्यानंतरच अर्ज स्वीकारणी सुरू होईल,’’ अशी माहिती ‘महावितरण’च्या मुख्यालयातून देण्यात आली. 

गावपातळीवर गोंधळ
राज्यात गावपातळीवर योजनेबाबत कमालीचा गोंधळ उडालेला आहे. ‘‘शेतकऱ्यांना अजूनही संकेतस्थळ बंद करण्यात आल्याची माहिती नाही. त्यामुळे बहुतेक गावांमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकरी अजूनही आपले सरकार सेवा केंद्रांवर चकरा मारताना दिसतात. तसेच ही योजना मूळ केंद्राची असून, केंद्र सरकारने ‘अटल सौर कृषिपंप योजना’ असे नाव दिले आहे. राज्य सरकारने या योजनेचे नाव बदलून ‘मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना’ असे दिले आहे. अनेक गावांमध्ये या योजना वेगवेगळ्या असल्याचा समज आहे. ‘तुमचा अर्ज या योजनेत नसला तर त्या योजनेत बसवू’ अशी उत्तरे शेतकऱ्यांना मिळतात. त्यामुळे अजूनही संभ्रम वाढला आहे,’’ अशी माहिती विदर्भातील ‘महावितरण’च्याच एका अधिकाऱ्याने दिली.

प्रतिक्रिया
वीजटंचाईमुळे मी हैराण आहे. गेल्या एक वर्षापासून सोलर पंपासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा मी प्रयत्न करतो आहे, मात्र वेबसाइट उघडत नाही. सरकारने बंद पडलेली वेबसाइट त्वरित सुरू करावी. 
— विजय विष्णू हागे, शेतकरी, लाडनापूर, ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा
 


इतर अॅग्रो विशेष
आधुनिक गुऱ्हाळाद्वारे केवळ चार गुंठ्यात...कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी...
थंडीत वाढ होण्याची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ...
तुरीला दराची झळाळीनांदेड : तूर उत्पादक पट्ट्यात नव्या तुरीची आवक...
इथे १५ मिनिटांत सोडवला जातो प्रश्‍न !पुणे : ‘‘आयएसओ’ मानांकन मिळविणारे आणि काही...
राज्यात साखरेचा महापूरपुणे : राज्यात गेल्या वर्षीची ३६ लाख टन साखर...
तंत्रज्ञान सप्ताहात शेतकऱ्यांना घातली...माळेगाव, जि. पुणे ः भरडधान्य उत्पादन,...
अद्याप ४१२ लाख टन ऊसगाळप बाकीपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ५३४...
कामे व्यवस्थित करा, अन्यथा पगारातून...पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)...
सरकारचा पसारा आवरासरकार कोणत्याही देशातला एक महत्त्वाचा घटक असतो....
यांत्रिकीकरणाचे वास्तव!मागच्या वर्षात (२०२०) भारतात नऊ महिने कडक...
बर्ड फ्लू ः खबरदारी आणि जबाबदारीमार्च-एप्रिल २०२० पासून देशात कोरोनाच्या...
पोखरलेला ‘पोकरा’नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) ...
प्रस्थापितांना दणका; तरुणाईची मुसंडी पुणे : राज्यात सोमवारी (ता. १८) ग्रामपंचायतींच्या...
किमान तापमानात वाढ पुणे ः राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र व...
शेतकऱ्यांच्या रॅलीबाबतचा निर्णय ...नवी दिल्ली ः विविध शेतकरी संघटनांकडून प्रजासत्ताक...
गहू, तांदळाच्या दराच्या प्रश्‍नांमुळेच...माळेगाव, जि. पुणे : देशपातळीवर आणि विशेषतः...
निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी...कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान...
रंगीत कापसाचा प्रयोग यशस्वीयवतमाळ  ः शेतीचा व्यासंग जपलेल्या मारेगाव...
व्यावसायिक दृष्टिकोनामुळेच यशस्वी...पुणे जिल्ह्यात अति पावसाच्या मावळ तालुक्यातील...
संयुक्त कुटुंबाचे शेती, पूरक उद्योगाचे...यशवंतवाडी (जि. लातूर) येथील पाच भाऊ व एकूण ४०...