agriculture news in Marathi, six in arrest in case of HTBT seed sell, Maharashtra | Agrowon

एचटीबीटी बियाणे विक्रीप्रकरणी सहा अटकेत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

वणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथून काहीजण बीटी बियाण्यांचे १५ पाकीट घेऊन येत असल्याची माहिती कृषी विभाग व पोलिसांना मिळाली. त्यांनी शिंदोला फाटा येथे सापळा रचून सहा जणांना अटक केली. 

वणी, जि. यवतमाळ  : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथून काहीजण बीटी बियाण्यांचे १५ पाकीट घेऊन येत असल्याची माहिती कृषी विभाग व पोलिसांना मिळाली. त्यांनी शिंदोला फाटा येथे सापळा रचून सहा जणांना अटक केली. 

महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. याकरिता गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण आदी राज्यांतून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी केली जात आहे. शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सतीश चवरे व तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांना कोरपना येथून दोन व्यक्ती एचटीबीटी बियाणे दुचाकीने आणत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शिंदोला फाट्याजवळ पोलिस उपनिरीक्षक डोंकलवार, योगेश ढाले, सुगत दिवेकर, संतोष उगडे, संजय खांडेकर, अभय मिश्रा यांनी सापळा रचला.

संशयित दुचाकीची तपासणी केली. त्यांच्याजवळून काव्या, बिजी २ नावाचे पाच पाकिटे, १११ आदेश नावाचे पाच पाकिटे व रघु नऊ नावाचे पाच पाकिटे असे एकूण १५ हजार ५० रुपयांचे प्रतिबंधित बियाणे जप्त करण्यात आले. 

हे बियाणे हिरापूर येथील एका कृषी केंद्रातून घेतल्याचे सांगितले. त्या कृषी केंद्रात पोचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांनी अन्य दोघांची नावे सांगितल्याने त्यांनाही अटक करण्यात आली. एकूण सहा जणांना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण आठ व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला.

एचटीबीटी बियाणे गुजरातमधून येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. जळगाव व गुजरातमधील दोन व्यापाऱ्यांचा मागावर शिरपूर पोलिस आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.  एचटी. बिटीचे बीजोत्पादन आणि पुरवठा आंध्रप्रदेश, तेलंगणा तसेच गुजरातमधून होतो. ही माहिती असतानाही तेथील मुख्य सूत्रधारांविरोधात कोणतीच कारवाई होत नसल्याचे वास्तव आहे. 

इतर अॅग्रो विशेष
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...