Agriculture news in Marathi, Six candidates in 12 constituencies | Agrowon

नगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघांत ११६ उमेदवार रिंगणात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नगर : नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर आता ११६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे बाराही विधानसभा मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अपक्ष आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांची संख्या जास्त असली तरी बहुतांशी ठिकाणी शिवसेना- भाजप महायुती व काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारातच लढत होत असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक उमेदवार नेवासा विधानसभा मतदारसंघात आहेत. 

नगर : नगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर आता ११६ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे बाराही विधानसभा मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अपक्ष आणि अन्य पक्षांच्या उमेदवारांची संख्या जास्त असली तरी बहुतांशी ठिकाणी शिवसेना- भाजप महायुती व काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवारातच लढत होत असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक उमेदवार नेवासा विधानसभा मतदारसंघात आहेत. 

विधानसभा निवडणुकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. नगर जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात अर्ज माघारी घेतल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. नगर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यासह माजी मंत्री अनिल राठोड, वंचित बहुजन आघाडीचे किरण काळे यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार वैभव पिचड, जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांच्यासह ४ उमेदवार रिंगणात आहेत. 

संगमनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेना-भाजप महायुतीचे साहेबराव नवले यांच्यासह आठ उमेदवार रिंगणात असून, शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसकडून सुरेश थोरात यांच्यासह पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रवादीचे आशितोष काळे यांच्यासह १४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे व जिल्हा परिषद सदस्य आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे अपक्ष रिंगणात आहेत. 

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लहू कानडे यांच्यासह ११ उमेदवार रिंगणात आहेत. नेवासा विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह तब्बल १७ उमेदवार रिंगणात आहेत. 

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार मोनिका राजळे, प्रताप ढाकणे यांच्यासह नऊ उमेदवार रिंगणात आहेत. तर राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार शिवाजी कर्डिले, प्राजक्त तनपुरे यांच्यासह ७ उमेदवार रिंगणात आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादीकडून नीलेश लंके यांच्यासह सहा उमेदवार रिंगणात असून, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये माजी मंत्री, बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीकडून घनशाम शेलार यांच्यासह ११ उमेदवार रिंगणात आहेत. 

जामखेड विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांच्यासह १२ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूक लढवत असल्यामुळे नगरसह राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. सर्व मतदारसंघांत उमेदवारांची संख्या जास्त असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना-भाजप यांच्या उमेदवारातच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...