पुणे जिल्ह्यात कृषी निविष्ठा पदविकेसाठी सहा केंद्रे

Six Centers for Agricultural Integrity Degree in the District
Six Centers for Agricultural Integrity Degree in the District

पुणे ः केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कृषी निविष्ठा विक्रेते आहेत. त्यापैकी बहुतांशी निविष्ठा विक्रेत्यांकडे कृषी पदवी, पदविकेची शैक्षणिक अर्हता नाही. त्यासाठी नोडल प्रशिक्षण संस्थेमार्फत सहा वर्गास मंजुरी दिली आहे. या प्रशिक्षण संस्थेमध्ये नोंदणी करून अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या निविष्ठा विक्रेत्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यानंतर या विक्रेत्यांना पुढील काळात निविष्ठांची विक्री करता येणार आहे.

यासाठी केंद्र सरकारच्या वतीने हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार प्रबंधन संस्थेमार्फत (मॅनेज) एक वर्षीय पदविका अभ्यासक्रम सुरू केला आहे. जिल्हा स्तरावर समन्वयक अधिकारी म्हणून आत्मा प्रकल्प संचालक यांना प्राधिकृत केले आहे. कृषी निविष्ठा विक्रेते हे कृषी विस्तारक म्हणून काम करत असल्याने रासायनिक कीटकनाशके व खतांच्या वापराबद्दल त्यांचे ज्ञान अद्यावत करणे हा मुख्य उद्देश आहे. म्हणून या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. याद्वारे रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा योग्य वापर केल्याने उत्पादन खर्चामध्ये बचत होऊन उत्पादन खर्च कमी झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य या निकषाने निवड करण्यात येईल.

कृषी विक्रेत्यांनी येथे संपर्क साधावा 
प्रशिक्षण संस्था समन्वयक संपर्क
कृषी विज्ञान केद्र, नारायणगाव वसंत कोल्हे  
पशुसंवर्धन महाविद्यालय, बारामती प्रा. गोरख साळुंके ९७३०३६७८२७
पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालय, बारामती प्रा. देवानंद घुले ९५२७६९३३२०
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान, पुणे स्मिता कदम ९८९०६८४५६१
ग्रामोन्नती मंडळ कृषी तंत्र निकेतन महाविद्यालय, नारायणगाव शिल्पा नरके ८३९०४४७८३२
कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव समीर रासकर ९६२३३२१९०५

अटी व शर्ती 

  • निविष्ठा विक्रेता हा परवानाधारक असून पुणे जिल्ह्यातील रहिवाशी असावा.
  • शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी.
  • विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरून डिलरची संपूर्ण माहिती, रासायनिक खत परवाना प्रत वैधता इ. साक्षांकित प्रती व तीन पासपोर्ट साईज फोटो आवश्यक
  • अर्जाचा नमुना व मार्गदर्शक सूचना मॅनेज, हैदराबाद यांच्या www.manage.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com