धुळे : ‘आधार’ नोंदणीसाठी २२ केंद्रे कार्यान्वित

‘आधार’ नोंदणीसाठी २२ केंद्रे कार्यान्वित
‘आधार’ नोंदणीसाठी २२ केंद्रे कार्यान्वित

धुळे : जिल्ह्यात आधार नोंदणी व आधार अद्ययावतीकरणासाठी विविध शासकीय कार्यालयात आधार संच केंद्र सुरू आहेत. त्यात धुळे शहर व परिसरात २२ ठिकाणी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणासाठी केंद्रे सुरू आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा ‘आधार’चे नोडल अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली. 

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण भारत सरकारद्वारे ९ ऑगस्टला https://uidai.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीप्रमाणे विविध दुरुस्तीसाठी पुढील कागदपत्रे आवश्‍यक आहेत. प्रत्येक आधार अपडेशनसाठी ५० रुपये शुल्क निश्‍चित केले असून, नवीन आधार नोंदणीसाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्‍यकता नाही. 

धुळे शहरात सद्य:स्थितीत आधार केंद्र (चालकाचे नाव व ठिकाण या क्रमाने) : संजय कुसळकर (मनपा कार्यालय, जुनी इमारत), राजेंद्र वानखेडकर (ग्रामीण तहसील कार्यालय, धुळे), संजय येलमामे (मनपा शाळा क्रमांक २, जुने धुळे), दिलीप मिस्तरी (जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे), राजेंद्र वानखेडकर (मनपा प्राथमिक आरोग्य केंद्र, तिरंगा चौक, फुटी रोड, धुळे), मंगला मोरे (पंचायत समिती कार्यालय, धुळे), सुरेखा बाविस्कर (ग्रामपंचायत कार्यालय, महिंदळे), महेंद्र शिरसाट (मनपा शाळा क्रमांक ६, मनोहर चित्रपटगृहाजवळ), नूरुद्दीन शेख (जिल्हा परिषद कार्यालय) पूजा मोरे (मनपा प्रभाग कार्यालय, मोहाडी उपनगर), अनिल वाणी (जुने ग्रामपंचायत कार्यालय, वलवाडी)

बॅंक, टपाल कार्यालयांत नोंदणी  बॅंक व टपाल कार्यालयांतही आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. त्यांची नावे अशी : इंडिया पोस्ट ऑफिस, गल्ली क्रमांक ५, सोन्या मारुती मंदिरजवळ, धुळे. पोस्ट ऑफिस, विद्यानगरी, देवपूर. पोस्ट ऑफिस, जयहिंद कॉलनी, पोस्ट ऑफिस. पोस्ट ऑफिस, गल्ली क्रमांक १, मुख्य पोस्ट ऑफिस, धुळे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया, प्रमोदनगर शाखा, श्रेयस कॉलनी, देवपूर. बॅंक ऑफ इंडिया, गल्ली क्रमांक ४, महाराष्ट्र बॅंकेसमोर. युनियन बॅंक ऑफ इंडिया, गल्ली क्रमांक ५. बॅक ऑफ बडोदा, रामवाडी. ऍक्‍सिस बॅंक, गल्ली क्रमांक १. बॅंक ऑफ महाराष्ट्र, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ, खोलगल्ली. पंजाब नॅशनल बॅंक, बालाजी मंदिराजवळ, गल्ली क्रमांक ४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com