जालना जिल्ह्यातील सहा केंद्रांवरून २९ हजार ७७१ क्विंटल तूर खरेदी

जालना : जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवरून ३४४५ शेतकऱ्यांची २९ हजार ७७१ क्विंटल ९ किलो तूर खरेदी करण्यात आली. जवळपास २२२२ शेतकऱ्यांना तूरीचे चूकारे देण्यात आले, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.
 From six centers in Jalna district Purchase of 29 thousand 771 quintals of tur
From six centers in Jalna district Purchase of 29 thousand 771 quintals of tur

जालना : जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवरून ३४४५ शेतकऱ्यांची २९ हजार ७७१ क्विंटल ९ किलो तूर खरेदी करण्यात आली. जवळपास २२२२ शेतकऱ्यांना तूरीचे चूकारे देण्यात आले, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली. 

जिल्ह्यात तुरीच्या खरेदीसाठी सहा केंद्रे सुरू करण्यात आली होती. या सहा केंद्रांवर ७३०९ शेतकऱ्यांनी तुरीची नोंदणी केली. त्यांपैकी ७ हजार २६८ शेतकऱ्यांना खरेदीसाठीचे संदेश पाठविण्यात आले. त्यांपैकी ३४४५ शेतकऱ्यांकडील २९ हजार ७७१ क्विंटल ९ किलो तूर खरेदी करण्यात आली. त्यांपैकी २२२२ शेतकऱ्यांना चुकारे दिले गेले. तर, १२२३ शेतकऱ्यांचे चुकारे देणे बाकी आहे, असे पणन अधिकारी विमल वाघमारे यांनी स्पष्ट केले. 

तुरी पाठोपाठ हरभऱ्याची खरेदी व्हावी म्हणून जिल्ह्यातील सहा केंद्रावर ५२२२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी जालना केंद्रावरील ४२० व भोकरदन केंद्रावरील ६८०, परतूर केंद्रावरील २० शेतकऱ्यांना खरेदीसाठी संदेश पाठविण्यात आले. या ३ केंद्रांपैकी जालना केंद्रावरून २४५ शेतकऱ्यांकडील ३८०१ क्विंटल व भोकरदन चंद्रावरील ४०९ शेतकऱ्यांकडून ४ हजार ३७७ क्विंटल मिळून ८१७९ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. त्या‍याचे चुकारे देणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com