`सीसीआय`कडून सहा कोटी क्विंटल कापूस खरेदी 

कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय) देशात यावर्षी विक्रमी सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
cotton procurement
cotton procurement

नागपूर : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय) देशात यावर्षी विक्रमी सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. देशात यावर्षी सुमारे 19 कोटी क्विंटल कापूस उत्पादनाचा अंदाज असून महाराष्ट्रात अद्यापही पणन महासंघाकडून कापसाची खरेदी होत आहे. 

केंद्र सरकारने कापसाला या वर्षी 5 हजार 550 रुपये क्विंटलचा हमीभाव जाहीर केला होता. बाजारात मात्र हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ तसेच महाराष्ट्रात कापूस पणन महासंघाला कापूस विकण्यावर भर दिला. त्यामुळे दोन्ही यंत्रणांकडे कापसाची या वर्षी विक्रमी आवक नोंदविण्यात आली. ‘सीसीआय’ने यावर्षी देशभरात सुमारे पाचशे वीस लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. त्यापासून 104 लाख गाठी तयार करण्यात आल्या. 

महाराष्ट्रात ‘सीसीआय’चा एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदीसाठी पुढाकार घेतला. ‘सीसीआय’ने महाराष्ट्रात 140 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. तर पणन महासंघाची कापूस खरेदी आजवर 95 लाख क्विंटल झाली आहे. या माध्यमातून ‘सीसीआय’चा 520 लाख क्विंटल तर पणन महासंघाचा 95 लाख क्विंटल अशी मिळून देशात सुमारे सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आयात-निर्यात प्रभावित झाली आहे त्याचा फटका कापसावर आधारित प्रक्रिया उद्योगालाही बसला आहे. 

कापूस गाठींना मागणी नसल्याने गेल्या वेळचा शिल्लक स्टॉक आणि यावर्षी तयार गाठींची विक्री करण्याचे आव्हान ‘सीसीआय’समोर आहे. त्यावर पर्याय म्हणून कापूस गाठीची विक्री सवलतीच्या दरात करण्यावर भर देण्यात आला आहे. कापूस खरेदीसाठी सवलतीचा दर मिळावा याकरिता काही लाख गाठींच्या खरेदीची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. अशाप्रकारे गेल्या दीड महिन्यात तीस लाख गाठींची विक्री करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यामध्ये यावर्षीच्या हंगामातील 26 लाख गाठींचा समावेश आहे. उर्वरित गाठी ह्या गेल्या हंगामातील असल्याची माहिती देखील देण्यात आली.  देशाची कापूस स्थिती  19 कोटी क्विंटल  एकूण उत्पादन   6 कोटी क्विंटल  ‘सीसीआय’ची खरेदी 13 कोटी क्विंटल  खासगी खरेदी  प्रतिक्रिया देशात यावर्षी सुमारे सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी ‘सीसीआय’ने केली आहे. पावसाच्या कारणामुळे महाराष्ट्रात सध्या खरेदी बंद असली तरी कापूस विक्रीसाठी आल्यास सप्टेंबर महिन्यात पुन्हा खरेदी सुरू करू.  - प्रदीप कुमार अग्रवाल, अध्यक्ष, ‘सीसीआय’.  देशात या वर्षी 19 कोटी क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित आहे. ‘सीसीआय’ने हमीभावाने सहा कोटी क्विंटल कापसाची खरेदी केली आहे, उर्वरित खरेदी खासगी व्यापाऱ्यांकडून झाली आहे.  - गोविंद वैराळे, ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com