Warehouse : लाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा गोडाऊन

जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा येथे १०८०० टनाचे म्हणजे प्रत्येकी १८०० टनाचे सहा गोडाऊन मंजूर झालेले आहे. यापूर्वी लाखांदूर तालुक्यामध्ये १५०० मेट्रिक टन क्षमतेचे १ गोडाऊन आहे. या नव्या क्षमतेमुळे धान साठवणुकीचा प्रश्न सुटणार आहे.
Six godowns for grain storage in Lakhandur taluka
Six godowns for grain storage in Lakhandur taluka

भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा येथे १०८०० टनाचे म्हणजे प्रत्येकी १८०० टनाचे सहा गोडाऊन मंजूर झालेले आहे. यापूर्वी लाखांदूर तालुक्यामध्ये १५०० मेट्रिक टन क्षमतेचे १ गोडाऊन आहे. या नव्या  क्षमतेमुळे धान साठवणुकीचा प्रश्न सुटणार आहे.

धान साठवणुकीकरिता व्यवस्थित आणि निश्चित अशी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अवकाळी पाऊस आणि या प्रकारच्या आपत्तीमुळे धान्य खराब होत असते. म्हणून मोठ्या गोडाऊनची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. या मागणीच्या संदर्भाने नवीन ६ गोडाऊन बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांनी प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग यांचेकडे दिला होता.

गोदामाच्या अंदाजपत्रकास व बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाने तांत्रिक सहमती दिलेली असून या प्रस्तावाची किंमत पंधरा कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे या प्रस्तावास मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेली आहे. ही बाब शासकीय गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास व कामास नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाअंतर्गत प्रशासकीय मंजुरी देण्याची बाब म्हणून शासनाच्या विचाराधीन होती.

यावर मंगळवारी (ता. २७) शासन निर्णय करून १०८०० टन क्षमतेच्या या गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास व कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रस्तावित गोदामाची अंदाजपत्रकीय किंमत ही २९ कोटी ९६ लक्ष ३८ हजार रुपये असून सुमारे २३ कोटी ६१ लक्ष ६८ हजार रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांना विशेष करून याचा खूप मोठा फायदा होणार आहे. कारण या भागातील ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. म्हणून ही बाब महत्त्वपूर्ण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com