Agriculture news in Marathi Six lakh packets of Bt cotton available in Parbhani district | Agrowon

परभणी जिल्ह्यात बीटी कपाशीची सहा लाख पाकिटे उपलब्ध

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

परभणी ः परभणी जिल्ह्यात सोमवार (ता. २५) पासून बीटी कपाशीचे बियाणे विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले तरी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड १ जून नंतरच करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.

परभणी ः परभणी जिल्ह्यात सोमवार (ता. २५) पासून बीटी कपाशीचे बियाणे विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले तरी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कपाशीची लागवड १ जून नंतरच करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.

दरम्यान, आजवर बीटी कपाशी बियाण्याची ६ लाख ५ हजारांवर पाकिटे उपलब्ध झाली असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.गतवर्षी (२०१९-२०) मध्ये परभणी जिल्ह्यात २ लाख ६ हजार ९६५ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. गतवर्षीच्या हंगामात ८ लाख १ हजार ९ बीटी कपाशी बियाण्याच्या पाकिटांचा पुरवठा करण्यात आला होता. यंदा जिल्ह्यातील कपाशीच्या क्षेत्रात १६ हजार ३५ हेक्टरने वाढ गृहीत धरून एकूण २ लाख २३ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड प्रस्तावित आहे.

जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांमार्फत बीटी कपाशीचे बियाणे सोमवार (ता. २५) कापूस उत्पादक शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. परंतु वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच या अळीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी १ जून पूर्वी पूर्वहंगामी कपाशीची लागवड करू नये, अशी शिफारस केलेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे बियाणे खरेदी केले. तरी कोणत्याही परिस्थिती लागवड मात्र १ जूनपूर्वी करू नये, असे आवाहन आळसे यांनी केले आहे.

यंदा कपाशीच्या प्रस्तावित लागवड क्षेत्राची गरज लक्षात प्रतिहेक्टर ५.५० पाकिटे याप्रमाणे बीटी कपाशी (बीजी २) बियाण्याच्या १२ लाख ६० हजार पाकिटांची मागणी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे करण्यात आलेली आहे. त्यापैकी खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून कपाशीच्या ६ लाख ५ हजारांवर बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. सोयाबीनचे २० हजार क्विंटलवर बियाणे तसेच विविध ग्रेडच्या ५२ हजार २५८ टन रासायनिक खतांचा पुरवठा झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे यांनी दिली.

गर्दी कमी करण्यासाठी सोमवार (ता. २५) पासून बीटी कपाशी बियाण्याची विक्री सुरू केली जात आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावे. परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कपाशीची लागवड मात्र एक जून नंतरच करावी.
- संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...
जळगाव जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटातजळगाव  ः जिल्ह्यात रोज सुमारे साडेसहा लाख...
जळगावात पीक कर्जवाटपाची गती अतिशय संथजळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
`औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीची मुदत...औरंगाबाद : झालेली मका खरेदी व बाकी असलेली...
धुळे जिल्ह्यात मक्यावर लष्करी अळीचा...देऊर, जि. धुळे  : जिल्ह्यात मका पिकावर...
सांगलीत दुग्ध व्यवसाय बंद पडण्याच्या...सांगली  ः शेतीपूरक दूग्ध व्यवसाय पशुखाद्य...
सिंधुदुर्गात दुध संकलनाची शासकीय...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात दुध संकलन करणाऱ्या...
कोल्हापुरात बिलांअभावी...कोल्हापूर : दुध संघांकडून वेळेत बिले मिळत...
‘पीकविमा प्रस्तावासाठी जनसुविधा केंद्र...नांदेड : ‘‘जिल्ह्यातील जनसुविधा केंद्र (सीएससी)...
परभणीत दर कपातीमुळे दूध उत्पादकांसमोर...परभणी : शासकीय दुग्धशाळेतील दूधाचे दर स्थिर आहेत...
सोलापुरात पावसाने जूनची सरासरी केली...सोलापूर  ः जिल्ह्यात यंदा पावसाने चांगली...
भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील...सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा...
पुणे जिल्ह्यात दूध दराअभावी शेतकऱ्यांचे...पुणे ः ‘कोरोना’मुळे दूध व्यवसाय अडचणीत आला आहे....
हिंगोलीत ‘कर्जमुक्ती’तून ७० हजार...हिंगोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न,...सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील...
कृषी केंद्रात दरफलक नसल्यास...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्र चालविणाऱ्या...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’ने केली वीज...सोलापूर : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे राज्यात...
नगर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक मेटाकुटीलानगर ः जिल्ह्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू...
पदरमोड करून दूध व्यवसाय करण्याची...सोलापूर  ः चारा व पशुखाद्याच्या वाढत्या...
कोल्हापुरात वाढीव वीज बिलांची होळीकोल्हापूर : वाढीव वीज बिलांविरोधात येथील...