खरिपासाठी सहा लाख क्विंटल बियाणे

खरिपासाठी सहा लाख क्विंटल बियाणे
खरिपासाठी सहा लाख क्विंटल बियाणे

अकोला : आगामी हंगामाच्या दृष्टीने महाबीजने सुमारे पाच लाख ९७ हजार ७७४ क्विंटल बियाणे पुरविण्याचे नियोजन केले आहे. सध्या पाच लाख ५७ हजार ९८९ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. या हंगामात कडधान्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी दराने बियाणे मिळणार आहे.   बीटी कपाशीवर बोंड अळीचा प्रादुभार्व झाल्याने यावर्षी हे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन व इतर पिकांचे क्षेत्र वाढू शकते. आगामी हंगामासाठी केलेल्या नियोजनानुसार १५ वर्षांअातील सोयाबीनचे ५४ हजार ५४० क्विंटल आणि १५ वर्षांवरील तीन लाख ९५ हजार ४६० क्विंटल असे एकूण चार लाख ५० हजार क्विंटल बियाणे नियोजन आहे. मात्र सध्या महाबीजकडे सोयाबीनचे चार लाख ३० हजार क्विंटल हे बियाणे उपलब्ध आहे. २० हजार क्विंटलची तूट असून ती ई-निविदा काढून बियाणे खरेदी करीत भरून काढावी लागणार आहे.   महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा मुख्य स्त्रोत मध्य प्रदेश आहे. या राज्यात गेल्या हंगामात सोयाबीन बीजोत्पादनाला मोठा फटका बसला होता. यामुळे महाबीजकडे सोयाबीन बियाण्याची सुमारे २० हजार क्विंटलची तूट आली आहे. ही तूट भरून काढत राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी महाबीज ई-निविदा काढून खरेदी करेल, अशी महाबीजच्या सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय तेलताड योजनेअंतर्गत बियाण्यासाठी शेतकऱ्यांना बियाण्याच्या कालावधी (वर्षे)वरून अनुदान दिले जाईल. येत्या हंगामात महामंडळाद्वारे ग्रामबिजोत्पादन योजना सोयाबीन व भात बियाण्यासाठी राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो मंजूर झाल्यानंतर त्याचाही लाभ शेतकऱ्यांना दिला जाईल. कडधान्याचे बियाणे दर घसरले कडधान्यांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाबीजचे बियाणे सुमारे २५ ते ३० टक्के कमी दराने उपलब्ध होणार आहे. बाजारपेठेत मिळणाऱ्या दरांवर बियाण्याचे दर निश्चित होत असतात. तूर, उडीद, मूग या धान्यांचे दर बाजारात कमी असल्याने बियाणे दर निश्चिती करताना ते गृहीत धरून आगामी हंगामासाठी या वाणांचे दर निश्चित केले आहेत.  

बियाणे उपलब्धता
सोयाबीन ४५००००
तूर १६५४५
उडीद २०४५५
मूग ७०३१
सं. ज्वारी १०७०५
सु. बाजरी १५७३
धान ६३०६०
सं. धान ५७५
सं. मका ७५००
एकूण ५९७७७४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com