agriculture news in marathi, six mla enter in lok sabha, mumbai, maharashtra | Agrowon

अकरापैकी सहा आमदारांचा लोकसभेत प्रवेश

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

मुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विद्यमान ११ पैकी सहा आमदारांना जनतेने लोकसभेत पाठविले आहे तर पाच आमदारांना मतदारांनी दिल्लीत जाण्यापासून रोखले आहे. खासदार म्हणून निवडून गेलेल्या विधानसभा सदस्यांमध्ये अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या आमदारांना १५ दिवसांत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

मुंबई ः सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विद्यमान ११ पैकी सहा आमदारांना जनतेने लोकसभेत पाठविले आहे तर पाच आमदारांना मतदारांनी दिल्लीत जाण्यापासून रोखले आहे. खासदार म्हणून निवडून गेलेल्या विधानसभा सदस्यांमध्ये अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांचा समावेश आहे. निवडून आलेल्या आमदारांना १५ दिवसांत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीतील आव्हान लक्षात घेऊन भाजप, काँग्रेस तसेच शिवसेनेने आपल्या काही विद्यमान आमदारांना लोकसभेचे तिकीट दिले होते. खासदारकीसाठी शिवसेनेचे विदर्भातील आमदार सुरेश धानोरकर यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि अखेरच्या क्षणी तिकीट मिळविले होते. संसदेत प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या के. सी. पाडवी, कुणाल पाटील, संग्राम जगताप, भाऊसाहेब कांबळे, सुभाष झांबड या विधिमंडळ सदस्यांना पराभवाचा दणका बसला आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपने सुरवातीला विधान परिषद सदस्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शेवटच्या क्षणी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आले. पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यावर मात केली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने सुरवातीला विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली होती. परंतु, बांगडेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुरेश धानोरकर यांना तिकीट दिले. धानोरकर यांनी त्यासाठी आमदारकीवर पाणी सोडले. चंद्रपूरमधील निकराच्या लढाईत धानोरकर यांनी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव केला. शिवसेनेने हिंगोलीत नांदेड शहरातील आमदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. पाटील यांनी पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवत काँग्रेसच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव केला.

नांदेडमध्ये काँग्रेस उमदेवार अशोक चव्हाण यांना अस्मान दाखविणारे प्रतापराव पाटील-चिखलीकर हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र, नांदेड महापालिका निवडणुकीवेळी चिखलीकर यांनी टोपी फिरवली आणि ते भाजपमध्ये दाखल झाले. भाजपने त्यांना नांदेडमधून उमेदवारी दिली आणि ते काँग्रेसचे ‘हेवीवेट’ नेते अशोक चव्हाण यांचा पराभव करून निवडून आले.

औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि आमदार इम्तियाज जलील निवडून आले आहेत. जलील हे एमआयएमचे आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. येथून काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सुभाष झांबड हेही निवडणूक रिंगणात होते. नगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपच्या डॉ. सुजय विखे-पाटील यांना झुंज दिली. मात्र, यात जगताप यांना अपयश आले. शिर्डीतून काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.
 
हे विधिमंडळातून संसदेत दाखल 

  • उन्मेष पाटील (भाजप)
  • सुरेश धानोरकर (काँग्रेस)
  • हेमंत पाटील (शिवसेना)
  • प्रतापराव पाटील-चिखलीकर (भाजप)
  • इम्तियाज जलील (एमआयएम)
  • गिरीश बापट (भाजप)

इतर बातम्या
रताळे वनस्पती गंधाद्वारे देते अन्य...एखाद्या हल्ल्याची चाहूल लागल्यास बहुतांश सजीव...
शेतमाल तारण योजनेअंतर्गत कारंजा बाजार...कारंजालाड, जि. वाशीम  ः शेतकऱ्यांचा शेतमाल...
खानदेशात कापूस दर स्थिर; खेडा खरेदीला...जळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
अधिक ओलावा असलेल्या कापसासाठी हवी...वर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक...
मराठवाड्यात पाच मोठे प्रकल्प तुडुंब औरंगाबाद : मराठवाड्यातील ११ पैकी पाच मोठे...
शेतमालाच्या शिवार खरेदीवर लक्ष द्या :...जळगाव  ः खानदेशात कापसापाठोपाठ केळी, कांदा व...
सोलापुरात चारा छावण्यांवर २४५ कोटी...सोलापूर ः दुष्काळामध्ये जिल्ह्यात चारा छावण्यांवर...
नाशिक : पणन मंडळाच्या केंद्रातून दुबईला...नाशिक : कसमादे पट्ट्यात सटाणा, कळवण, मालेगाव...
शेतीपूरक उद्योगाची कास धरा ः पोकळे जालना  : ‘‘निसर्गाच्या लहरीपणामुळे कोरडवाहू...
परभणी जिल्ह्यात ज्वारीची ८७ हजार...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची...नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व...
सोलापूर जिल्ह्यात मदतीचे अनुदान...सोलापूर : दोन महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात...
सांगली : पूरग्रस्तांसाठी १०२ कोटी...सांगली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांमध्ये...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
पुणे विभागात रब्बीचा साडेसात लाख...पुणे  ः चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागांत...
शिरुरमधील साडेसहा हजारांवर शेतकरी...पुणे  ः यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
सरकारच्या निर्णयाचा जिल्हा परिषदेला...नगर  ः राज्य सरकारने मागील सरकारच्या काळात...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...