कोकणातील सहा दुर्लक्षित वनौषधीची व्यापारी दृष्टिकोनातून होणार लागवड 

कोकणातील सहा दुर्लक्षित वनौषधीची व्यापारी दृष्टिकोनातून समूह पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. त्यातील तीन वनस्पतीची कलमे तयार करण्यात वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला यश आले आहे.
कोकणातील सहा दुर्लक्षित वनौषधीची  व्यापारी दृष्टिकोनातून होणार लागवड Six neglected herbal remedies in Konkan Cultivation will be from a commercial point of view
कोकणातील सहा दुर्लक्षित वनौषधीची  व्यापारी दृष्टिकोनातून होणार लागवड Six neglected herbal remedies in Konkan Cultivation will be from a commercial point of view

सिंधुदुर्गनगरी : कोकणातील सहा दुर्लक्षित वनौषधीची व्यापारी दृष्टिकोनातून समूह पद्धतीने लागवड करण्यात येणार आहे. त्यातील तीन वनस्पतीची कलमे तयार करण्यात वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राला यश आले असून, उर्वरित तीन वनस्पतींवर काम सुरू आहे. ज्या भागातील मूळ वनस्पती आहे, त्याच भागातील शेतकऱ्यांना ती लागवडीकरीता प्रोत्साहित केले जाणार आहे. 

लुपिन फाउडेंशन सिंधुदुर्ग आणि वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र यांच्यामध्ये या दुर्लक्षित वनस्पतीचे संवर्धन आणि त्यांच्या व्यापारी लागवडीच्या दृष्टीने सामंजस्य करार झाला आहे. गेली दोन तीन वर्ष काम सुरू आहे. त्या अनुषंगाने डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली निमत्रिंताच्या गट चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी फळ संशोधन केंद्राचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदळणकर, डॉ. बी. एम. सावंत, लुपिनचे योगेश प्रभू, डॉ. विजय देसाई, डॉ. एम. एस. गव्हाणकर, डॉ. मंगल कदम, डॉ. मोहन दळवी आदी उपस्थित होते. 

लुपिनचे योगेश प्रभू यांनी कोकणातील आंबा, काजू ही पिके महत्त्वाची असून अर्थकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहेच. परंतु त्यावरच अवलंबून राहता कामा नये. म्हणूनच सुरंगी, पपई आणि जांभूळ, वावडिंग, कडीकोकम आणि त्रिफळा या जिल्ह्यात आढळणाऱ्या दुर्लक्षित वनस्पती अर्थकारणाला बळकटी देऊ शकतात. त्यामुळेच पहिल्या टप्प्यात सुरंगी, पपई आणि जांभूळ या तीन वनस्पतीवर काम सुरू केले. नैसर्गिक पद्धतीने ही रोपे तयार होतात. परंतु त्याची कलमे तयार करून त्याची ज्या भागातील वाण आहे त्याच भागात ती कलमे व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करण्याची ही संकल्पना आहे. या वेळी फळसंशोधन केंद्राचे डॉ. हळदणकर यांनी या तीन झाडांवर आतापर्यंत कुठेही संशोधन झालेले नाही. फळ संशोधन केंद्रांच्या संशोधकांनी गेली दोन तीन वर्ष अहोरात्र प्रयत्न करून त्यात यश मिळविले आहे. या वर्षीपासून १० ते १५ हजार कलम रोपांची निर्मिती करणार आहोत. अनुभव आणि प्रयत्नातून हे काम सुरू आहे. जगात कुठेही त्यासंदर्भात संशोधन साहित्य उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

उर्वरित त्रिफळा, कडीकोकमची कलमे तयार करण्यात यश येत आहे परंतु अजूनही वावडिंगमध्ये यश आलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी दुर्लक्षित वनस्पतीची व्यापारी दृष्टिकोनातून समूह पद्धतीने लागवड करण्याची संकल्पनाच सुंदर आहे. यातून पंचक्रोशीतच मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार झाले तर त्याच ठिकाणी भविष्यात प्रकिया उद्योग निर्माण होऊ शकतील. या वनस्पतीमध्ये परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता आहे. त्यामुळे हे संथपणे होऊ दे परंतु, ते नियोजनबद्ध होऊ दे, असा आग्रह त्यांनी धरला. 

सुरंगी  गावाची निवड-आसोली, टाक, सोन्सुरे, कोलगाव, नेमळ,  रोपांचे उद्दिष्ट-१० हजार  यापूर्वी लागवड केलेली रोपे-३ हजार 

पपई  गावाची निवड- तुळस, होडावडे, वजराठ, मातोंड, (ता. वेंगुर्ला)  सांगेली, कारीवडे, माडखोल, तळवडे, (ता. सावंतवाडी)  आडाळी, सासोली, मणेरी, मोरगाव (ता. दोडामार्ग)  रोपांचे उद्दिष्ट-१८ हजार  लागवडीखाली येणारे क्षेत्र-२३ एकर  स्थानिक १६० पपईच्या वाणातून निवड 

जांभुळ  आंब्रड, कुंदे, पोखरण, कडावल, निरूखे, सावंतवाडी, कोलगाव, कालेली, माणगाव,  रोपांचे उद्दिष्ट-१५ हजार कलमे  लागवडीखाली येणारे क्षेत्र-२५० एकर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com