Agriculture news in marathi, Six thousand farmers deprived of 'debt relief' in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’पासून सहा हजारांवर शेतकरी वंचित

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 डिसेंबर 2021

परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ४४६ शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार १३७ कोटी ९० लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले.

परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८२ हजार ४४६ शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार १३७ कोटी ९० लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. परंतु कर्जमाफीची रक्कम जमा न झाल्यामुळे ६ हजार २३९ शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. खात्यावर बाकी शिल्लक आहे. त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळणे कठीण झाले आहे.

कर्जमुक्तीसाठी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये पीककर्ज घेतलेले शेतकरी पात्र आहेत. या अंतर्गत  जिल्ह्यातील २ लाख ८ हजार ४१३ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. आजवर प्राप्त आठ याद्यांनुसार एकूण १ लाख ९२ हजार ९९९३ कर्जखात्यांच्या विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झाले आहेत. या योजनेच्या लाभासाठी पात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य होते. त्यासाठी अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली.

सोमवार (ता. १५ नोव्हेंबर) पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती. या कालावधीत एकूण १ लाख ८८ हजार ६८५ शेतकरी खातेदारांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. अजून ३ हजार ६०१ कर्जखात्यांचे आधार प्रमाणीकरण शिल्लक राहिले आहे. आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या कर्जखात्यांमध्ये मयत व्यक्ती, अल्प कर्ज रक्कम असलेली खाती आहेत, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

 


इतर बातम्या
भात खरेदी दराची वाढ शेतकऱ्यांच्या...राजापूर (जि. रत्नागिरी) ः अनियमित पाऊस, अतिवृष्टी...
जनावरांचे दवाखाने सक्षम करू : स्वामीसोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील पशुसंवर्धन दवाखान्याच्या...
मराठवाड्यात २२.९८ लाख हेक्‍टरवर रब्बीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदाच्या...
‘चोसाका’कडील थकीत रक्कम त्वरित द्यावीचोपडा, जि. जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून...बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील...
परभणी जिल्ह्यात आणखी ३८.५१ कोटींची...परभणी : जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
ठिबक, तुषार सिंचनाचे अनुदान वाढले ः...नांदेड : ‘‘शासनाने ठिबक तसेच तुषार सिंचनासाठी...
सालेगाव येथे सिंचनाच्या अनुशेषासाठी ॲड...कळमनुरी, जि. हिंगोली ः जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष...
लातूरमध्ये खरेदी केंद्रांवर तूर...लातूर : जिल्ह्यात हमीदराने तूर खरेदीसाठी नोंदणीला...
उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस?सध्या मध्य प्रदेशच्या मध्यभागी हवेचे कमी दाबाचे...
बँकांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे लिलाव...जयपूर - राजस्थानमधील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या...
दहावीपर्यंत शिक्षण असून हुकूमचंद तयार...दहावीनंतर शिक्षणाला रामराम ठोकणारे हुकूमचंद...
भारताच्या गहू अनुदान धोरणावर...भारत सरकारकडून देशांतर्गत साखर उद्योगासाठी (Sugar...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
जादा दराने खतांची विक्री सात...नाशिक : रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खतांना मागणी...
महिलांच्या विरोधाने दारू दुकान बंद सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : दारूबंदी असलेल्या...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
उजनीतील बेकायदा प्रवासी बोंटिगवर कारवाई...पुणे : उजनी जलाशयातून करमाळा तालुक्यातील एक...
दोन नगर पंचायतीच्या निवडणुकीत बुलडाणा...बुलडाणा ः जिल्ह्यात दोन नगरपंचायतींचे निकाल लागले...