agriculture news in marathi Six thousand quintal grain will be converted in compost manure | Page 2 ||| Agrowon

सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट खत

गुरुवार, 9 सप्टेंबर 2021

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या वर्षी व शासकीय धान्य गोदामातील सहा हजार क्विंटल धान्य भिजले  होते. आता या सडलेल्या धान्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार आहे. 

भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या वर्षी व शासकीय धान्य गोदामातील सहा हजार क्विंटल धान्य भिजले  होते. आता या सडलेल्या धान्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार असून, जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पाठवलेल्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. 

मध्य प्रदेशातील प्रकल्पांची पातळी वाढल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गेल्या वर्षी वैनगंगा नदीला महापूर आला होता. या महापुराचे पाणी शासकीय गोदामात शिरले. गोदामात पाच ते सहा फूट पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात धान्य भिजले.

या गोदामातील १७ हजार क्विंटल धान्यापैकी तब्बल ६२६३ क्विंटल धान्य महापुरात नष्ट झाले. त्यात तांदूळ ३८२६ क्विंटल, गहू १८३३,  तूरडाळ २६६, चणाडाळ १८८, साखर १४४ क्विंटल याप्रमाणे समावेश होता. त्या वेळी भिजलेले धान्य सुकविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

चांगले धान्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. मात्र भिजलेल्या धान्याच्या प्रचंड दुर्गंधीमुळे प्रसिद्ध परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. खराब झालेल्या धान्या बाबत २८ ऑक्टोबर १९९९ च्या निर्णयानुसार विल्हेवाटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. परंतु त्याला मंजुरी न मिळाल्याने वर्षभरापासून धान्य गोदामात पडून होते.

आता शासनाने जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार या धान्याची विल्हेवाट लावण्यासाठी मार्गदर्शक सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी संतोष गहणकर यांनी दिल्या आहेत. यानुसार धान्याचे कंपोस्ट खत तयार केले जाणार असून, त्याकरिता हे अखाद्य धान्य कृषी विद्यापीठ किंवा कृषी विभागात देण्यात यावे असे निर्देश शासनाने दिले आहेत.

संयुक्तरीत्या विल्हेवाट...
जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे भिजलेले हे धान्य कंपोस्ट खत तयार करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या साकोली येथील कृषी विज्ञान केंद्रात पाठविले जाणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनात तहसीलदार आणि कृषी विभाग संयुक्तरीत्या या धान्याची विल्हेवाट लावणार आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...