agriculture news in Marathi six ton agri produce transport from kisan rail Maharashtra | Agrowon

किसान रेल्वेतून सहा टन शेतीमालाची वाहतूक 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

नाशवंत शेतीमालाची कमी वेळात आणि कमी दरात वाहतूक व्हावी यासाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता.

नागपूर ः नाशवंत शेतीमालाची कमी वेळात आणि कमी दरात वाहतूक व्हावी यासाठी ऑपरेशन ग्रीन अंतर्गत किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. याला विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत अवघ्या अडीच महिन्यांत किसान रेल्वेच्या माध्यमातून सहा हजार टनांहून अधिक माल निर्यात करण्यात आला. 

माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मध्ये रेल्वेला विचारणा केली होती. ऑपरेशन ग्रीन अंतर्गत नागपुरातून किती माल बाहेर पाठविण्यात आला. रेल्वे वाहतुकीतून रेल्वेला किती महसूल प्राप्त झाला आदी प्रश्‍न त्यातून विचारण्यात आले. मध्ये रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे ऑपरेशन ग्रीन सुरू करण्यात आले.

किसान रेल्वेतून माल पाठविल्यास शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात ५० टक्‍के सवलत मिळेल, असे त्यानंतर १३ ऑक्‍टोबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकातून सरकारने जाहीर केले. लगेच दुसऱ्या दिवशी १४ ऑक्टोबर २०२० पासून किसान रेल्वे सुरू करण्यात आली. याव्दारे ३१ डिसेंबरपर्यंत ६ हजार १७९ टन मालाची वाहतूक करण्यात आली. मध्ये रेल्वेला यातून १ कोटी ९९ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला. 

वाहतूकदारांचा विरोध 
देशांतर्गत व्यापारी, शेतकऱ्यांचा किसान रेल्वेला प्रतिसाद मिळाला. मध्य प्रदेशातील वाहतूकदारांनी याला विरोध केला आहे. इंदूर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने मालवाहतूक व्यवसायात असलेल्यांची यामुळे आर्थिक कोंडी झाल्याचा आरोप केला आहे. ट्रान्स्पोर्ट व्यवसाय कोरोना लॉकडाउनमुळे अडचणीत आला होता. किसान रेल्वेमुळे या अडचणीत भर पडली. त्यामुळे किसान रेल्वेच्या पर्यायाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी असोसिएशनने केली आहे. 

संत्रा उत्पादकांचा मिळाला प्रतिसाद 
नागपुरी संत्रा चव आणि रंगाबाबत वेगळेपण जपणारा आहे. मात्र याची टिकवणक्षमता कमी आहे. परिणामी, रस्ते मार्गाने गेल्यास फळ खराब होण्याची शक्‍यता अधिक राहते. किसान रेल्वेच्या माध्यमातून स्वस्त आणि गतिमान पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध झाला, त्यामुळेच शेतकऱ्यांचा त्याला व्यापक प्रतिसाद मिळाला अशी माहिती महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी दिली. 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात उद्यापासून वादळी पावसाचा इशारा पुणे : विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका...
गटशेतीच्या पायावर ‘एफपीसी’चा कळस पुणे : राज्यात अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना...
तोडणीला परवडेना टोमॅटो औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर, कन्नड तालुक्यातील...
महाराष्ट्राला साखर वाहतूक अनुदान...कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना...
संत्रा प्रक्रियेतून शेतकरी कंपनीची...वरुड (जि. अमरावती) येथील श्रमजीवी नागपुरी संत्रा...
तीन पूरक व्यवसायांचा शेतीला भक्कम आधारखरपुडी (ता.. जि.जालना ) येथील अल्पभूधारक शेतकरी...
कांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर...नाशिक : चालूवर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मागील...
उपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय...! रोपळे बुद्रुक, जि. सोलापूर : कोरोनाच लय भ्या...
कर्ज परतफेडीला मुदतवाढ मिळावी गोंदिया ः गेल्या हंगामात देण्यात आलेल्या...
परभणी, हिंगोलीत २० हजार क्विंटल हरभरा...परभणी ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
लासलगावला कांदा लिलावात सहभागी होण्यास...नाशिक : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या...
विदर्भात मेघगर्जनेसह पूर्वमोसमी पावसाची...पुणे : झारखंड ते उत्तर कर्नाटक, छत्तीसगड आणि...
हापूसचा दराचा गोडवा टिकून रत्नागिरी ः वातावरणातील अनियमितेचा परिणाम यंदा...
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...