नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यातबंदी तातडीने रद्द करावी, कांद्याची आयात थांबवा
ताज्या घडामोडी
औरंगाबाद विभागात १६ कारखान्यांना गाळप परवाने
औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर कारखान्यांनी यंदा गाळपासाठी परवाना मागितला. त्यापैकी आतापर्यंत १६ कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला आहे. त्यापैकी १० कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली असल्याची माहिती साखर विभागातील सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील १९ साखर कारखान्यांनी यंदा गाळपासाठी परवाना मागितला. त्यापैकी आतापर्यंत १६ कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला आहे. त्यापैकी १० कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली असल्याची माहिती साखर विभागातील सूत्रांनी दिली.
साखर सहसंचालक कार्यालय औरंगाबाद अंतर्गत धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड हे सहा जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्ये एकूण ३७ साखर कारखाने आहेत. यापैकी २४ कारखाने नियमीत गाळप करीत असतात. यंदा या कारखान्यांपैकी १९ कारखान्यांनी गाळप परवाना मागीतला. त्यापैकी १६ कारखान्यांना ४ डिसेंबरपर्यंत परवाने देण्यात आले होते. परवाना मिळालेल्या कारखान्यांपैकी २४ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान १० साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली. त्यामध्ये नंदूरबार, बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन, जळगाव व जालनामधील प्रत्येकी एक, तर औरंगाबाद जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे.
तीन डिसेंबर अखेरपर्यंत गाळप सुरू केलेल्या कारखान्यांनी १ लाख १० हजार ७५७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी ५.२८ टक्के साखर उताऱ्याने ५८ हजार ५१५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. त्यामध्ये नंदूरबार जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी ४७ हजार ६७१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३१ हजार ४० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील एका कारखान्याने ८४४० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
औरंगाबाद जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी २० हजार ५५० मेट्रिक टन ऊस गाळप, तर ९३०० क्विंटल उत्पादन, जालना जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने ११ हजार २४० मेट्रिक टन उसाचे गाळप, तर ७३५० क्विंटल उत्पादन, बीड जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी २२ हजार ८५५ मेट्रिक टन गाळप, तर ७०२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागातर्फे देण्यात आली.
८४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध
औरंगाबाद येथील साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत पाच जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) गाळप हंगामासाठी ८४ हजार ६५ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यामध्ये नंदूरबार जिल्ह्यातील १४५८५ हेक्टर, जळगाव ६९८८ हेक्टर, औरंगाबाद १३३०४ हेक्टर, जालना २६४७१ हेक्टर, तर बीड जिल्ह्यातील २२ हजार ७१७ हेक्टर उसाचा समावेश आहे.
यंदा पावसाने पिकांना मोठा फटका बसला. शिवाय चाऱ्याची उपलब्धता नसल्याने मोठ्या प्रमाणात उस चारा म्हणून वापरला गेला आहे. त्याचा थेट फटका कारखान्यांच्या ऊस गाळपाला बसणार आहे. उसाच्या पळवापळवीसह तुलनेत निम्मा काळ देखील कारखान्यांचे गाळप होईल, की नाही हा खरा प्रश्न आहे.
- 1 of 585
- ››