agriculture news in marathi, sixty lakh cotton bales exported from india | Agrowon

सहा लाख कापूस गाठींची निर्यात, आणखी १५ लाख गाठींचे सौदे

चंद्रकांत जाधव 
सोमवार, 3 डिसेंबर 2018

जळगाव ः डॉलरची तेजी कमी होऊन त्याचे दर २१ दिवसांत ७० रुपये प्रतिडॉलरवर खाली आले आहेत. डॉलरचे दर जसे कमी झाले, तसा निर्यातीसह आर्थिक बाबींवर परिणाम झाल्याने कापूस बाजार डगमगला आहे. सुमारे सहा लाख गाठींची निर्यात देशातून झाली असून, आणखी १५ लाख गाठींच्या निर्यातीचे सौदे झाले आहेत. परंतु कापसाची आवक हवी तशी नसल्याने कापसाचे दर स्थिर असल्याची माहिती आहे.

जळगाव ः डॉलरची तेजी कमी होऊन त्याचे दर २१ दिवसांत ७० रुपये प्रतिडॉलरवर खाली आले आहेत. डॉलरचे दर जसे कमी झाले, तसा निर्यातीसह आर्थिक बाबींवर परिणाम झाल्याने कापूस बाजार डगमगला आहे. सुमारे सहा लाख गाठींची निर्यात देशातून झाली असून, आणखी १५ लाख गाठींच्या निर्यातीचे सौदे झाले आहेत. परंतु कापसाची आवक हवी तशी नसल्याने कापसाचे दर स्थिर असल्याची माहिती आहे.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारासंबंधीच्या न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर १५ दिवसांत ८४ सेंटवरून ७९ सेंटवर आले आहेत. खंडीचे दर (३५६ किलो रुई) ४७५०० रुपयांवरून ४४००० रुपयांवर आले आहेत. पण कापसाची आवक महाराष्ट्र, तेलंगण, मध्य प्रदेशात अत्यल्प असल्याने त्याचे दर स्थिर आहेत. ऑक्‍टोबर महिना सुरू झाल्यानंतरच्या ४० ते ४५ दिवसांत बांगलादेश, व्हिएतनाम व पाकिस्तानात सुमारे सहा लाख गाठींची निर्यात झाली आहे. तर अंदाचे १५ लाख गाठींचे सौदे यशस्वी झाले असून, येत्या महिन्यात या गाठींची पाठवणूक पूर्ण होईल, अशी माहिती बाजारपेठ विश्‍लेषकांकडून मिळाली.

राज्यातील जिनिंगमध्ये कापूसटंचाई कायम आहे. ही टंचाई पुढेही मिटणार नाही, कारण पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झपाट्याने रिकामे होत आहे. कोरडवाहू कापसाचा हंगाम कर्नाटकात जवळपास आटोपला आहे. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि तेलंगणात कोरडवाहू कापसाचा हंगाम अखेरच्या स्थितीत आहे. यामुळे बाजार वित्तीय चढ-उतारातून जात असतानाही कापसाचे दर फारसे कमी झालेले नाहीत, असे सांगण्यात आले.

बांगलादेशकडून सध्या मागणी कमी आहे. कारण आर्थिक मुद्यांचा सामना बांगलादेशला करावा लागत आहे. कापडाला हवा तसा उठाव नसल्याने बांगलादेशमधील सूतनिर्मितीची प्रक्रिया काहीशी संथ झाली आहे.
न्यूयॉर्क वायदामध्ये कापसाचे दर कमी होताच खंडीसह सरकीच्या दरातही घसरण झाली आहे. सरकीचे दर १० दिवसांत २३०० रुपयांवरून प्रतिक्विंटल २१५० रुपयांवर आहेत. परंतु मागील आठवडाभरापासून सरकीचे दर स्थिर आहेत.

आकडे दृष्टिक्षेपात

  • ४४००० : खंडीचे दर
  • ७० रुपये : डॉलरचे दर
  • ७९ सेंट : न्यूयॉर्क वायदामधील कापसाचे दर
  • ६ लाख गाठी : देशात नव्या हंगामामधील निर्यात

चार लाख क्विंटल कापूस मिळणे अशक्‍य
राज्यात रोज चार लाख क्विंटल कापसाची आवश्‍यकता जिनिंगसह इतर खरेदीदारांना आहे. परंतु रोज फक्त दोन ते सव्वादोन लाख क्विंटल कापूस उपलब्ध होत आहे. जिनिंगसमोर कापूसटंचाई कायम आहे. ही स्थिती ऑक्‍टोबरच्या मध्यापासून कायम आहे. पुढेही अशीच स्थिती राहील, असे सांगण्यात आले.

डॉलरचे दर जसे कमी झाले, तसा कापूस बाजारात दबाव आला. सरकी व खंडीचे दर कमी झाले आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आपल्याकडील काही प्रमाणातील कापूस बाजारात विक्रीस आणणे योग्य ठरू शकते.
- दिनेश हेगडे, कापूस निर्यातदार, मुंबई

डॉलरचे दर सहा टक्‍क्‍यांनी मागील २० - २२ दिवसांत कमी झाले. अर्थातच सरकी व रुईच्या दरातही सहा टक्के घसरण निश्‍चित आहे. पण कापसाची आवक कमी आहे. अपेक्षेपेक्षा निम्मेच कापूस आपल्या राज्यात मिळत आहे.
- अरविंद जैन, माजी अध्यक्ष,
खानदेश जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन


इतर अॅग्रो विशेष
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...
पशुखाद्य दर गगणाला भिडलेसांगली ः दुष्काळ व अतिवृष्टीचा फटका पशुखाद्य...
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...