agriculture news in Marathi skill based training important for farm labor Maharashtra | Agrowon

शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण महत्त्वाचे : कृषी सचिव एकनाथ डवले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 ऑगस्ट 2020

बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी, फळबागांचे व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचनाची देखभाल आणि दुरुस्ती, रोपवाटिकेतील कामे, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी अशी सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. 

नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी, फळबागांचे व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचनाची देखभाल आणि दुरुस्ती, रोपवाटिकेतील कामे, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी अशी सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. त्यामुळे शेतीमधील उत्पादकता वाढीसाठी विविध निविष्ठांसोबत काम करणाऱ्या घटकांच्या कार्यक्षमतेचा विकास आवश्यक आहे. त्यासाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी केले. 

निफाड तालुक्यातील कुंदेवाडा येथील गहू संशोधन केंद्र येथे शुक्रवारी (ता.७) श्री. डवले यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य आधारीत शेतकरी व शेतमजुरांसाठी कीडनाशक फवारणीचे २ दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कृषी सहसंचालक संजीव पडवळ, निफाड उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, गहू संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. डवले म्हणाले कि, शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून कामाची गुणवत्ता व वेग सुधारण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या वेळी प्रशिक्षणार्थींना कीटकनाशकांची फवारणीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. 

प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी बी.जी. पाटील यांनी केले. मका पिकावरील किडींची ओळख व त्यावरील उपाययोजनांबाबत गहू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. सचिन वासू यांनी फवारणी दरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. श्री. पाटील यांनी लेबल क्लेम याविषयी तर विषबाधा झाल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबाबत मंडळ कृषी अधिकारी वरुण पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

तसेच कृषी साहाय्यक श्री.काळे, गणेश वाळके, लासलगाव मंडळ कृषी अधिकारी दीपक सोमवंशी, दिनेश देसले, समाधान शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यातील एकूण ७७ प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षण वर्गाचे सूत्रसंचालन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप बच्छाव यांनी केले. तर आभार श्री. जायभाये यांनी मानले. 

तरुणांचा सहभाग महत्त्वाचा 
तरुणांनी सहभागी होऊन कौशल्य विकसित केल्यास ते स्थानिक पातळीवर मार्गदर्शन करू शकतील. त्यांच्याच पुढाकारातून इतरांना कौशल्याधारीत मार्गदर्शन करणे शक्य होईल. त्यातून गावोगावी कृषी तंत्रज्ञान विस्तार होण्यास मदत होईल, असा विश्वास श्री.डवले यांनी व्यक्त केला. 
 


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...