agriculture news in Marathi, Slight improvement in gram rates in Jalgaon | Agrowon

जळगावात हरभरा दरात किंचित सुधारणा 
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 एप्रिल 2019

जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणा झाली असून, चोपडा, अमळनेर व मुक्ताईनगर येथील बाजारात आवक पुन्हा एकदा सुरू झाली आहे. देशी हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल ४१०० ते ४३५० रुपये आणि काबुली हरभऱ्याचे दर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. या दोन्ही प्रकारच्या हरभऱ्याच्या दरात मागील आठ ते दहा दिवसांत क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली आहे. 

जळगाव ः देशी व काबुली प्रकारच्या हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणा झाली असून, चोपडा, अमळनेर व मुक्ताईनगर येथील बाजारात आवक पुन्हा एकदा सुरू झाली आहे. देशी हरभऱ्याचे दर प्रतिक्विंटल ४१०० ते ४३५० रुपये आणि काबुली हरभऱ्याचे दर ६३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोचले आहेत. या दोन्ही प्रकारच्या हरभऱ्याच्या दरात मागील आठ ते दहा दिवसांत क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची सुधारणा झाली आहे. 

हरभऱ्याची शासकीय खरेदी अजून हव्या त्या गतीने सुरू झालेली नाही. ऑनलाइन नोंदणीनंतर खरेदीसंबंधीचे संदेश शासकीय खरेदीदार उपसंस्थांनी शेतकऱ्यांना दिले आहेत. परंतु, आवक हवी तशी नाही. शासकीय केंद्रातील नोंदणीदेखील अत्यल्पच असून, जळगाव येथील केंद्रात फक्त १०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. अर्थातच बाजारात दरात सुधारणा होत असल्याचे लक्षात घेता शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. 

मागील महिन्यात हरभऱ्याचे दर ३७०० ते ४१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. तर काबुली हरभऱ्यास प्रतिक्विंटल कमाल ६००० रुपये दर होते. परंतु, या महिन्याच्या मध्यानंतर दर स्थिरावले व सरत्या आठवड्यात दरात सुधारणा झाली आहे. दर कमी झाल्याने मध्यंतरी बाजारातील आवक नगण्य होती. जशी दरात सुधारणा झाली, तशी अमळनेर, चोपडा व मुक्ताईनगर येथील बाजारातील आवक वाढली आहे. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथील बाजारात देशी व काबुली हरभऱ्याची आवक नसल्यागत स्थिती आहे. 

जळगाव येथील बाजारात दरांबाबत फारशी समाधानकारक स्थिती न राहिल्याने अनेक शेतकऱ्यांनी चोपडा व अमळनेर येथील बाजाराला पसंती दिली. जशी दरात सुधारणा झाली, तशी पुन्हा चोपडा, अमळनेर येथील बाजारातील आवक वाढली असून, मागील आठवड्यात चोपडा बाजारात प्रतिदिन सरासरी २०० क्विंटल तर अमळनेर येथे २५० क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. तर मुक्ताईनगर येथेही मागील आठवड्यात तीन दिवस हरभऱ्याची बऱ्यापैकी आवक झाल्याचे सांगण्यात आले. पाचोरा, जळगाव, यावल येथील बाजारात मात्र आवक नगण्य होती, असे सांगण्यात आले. तुरीच्या दरातही क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ मागील आठवड्यात नोंदविण्यात आली. आवक मात्र चोपडा, जळगाव व मुक्ताईनगर बाजार समिती वगळता इतरत्र कुठे झाली नाही.

इतर बाजारभाव बातम्या
परभणीत वांगी ८०० ते १५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात गवार प्रतिक्विंटल १२०० ते ६०००...जळगावात प्रतिक्विंटल ५६०० रुपये जळगाव ः कृषी...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दर स्थिरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत शेतीमालाची...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटे ८०० ते १००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी प्रतिक्विंटल १८०० ते २२००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात कोथिंबीर प्रतिशेकडा ८०० ते ३५००...औरंगाबादेत प्रतिशेकडा ८०० ते ११०० रुपये औरंगाबाद...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ५००० ते ५९००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः नवती केळीच्या दरात मागील आठवडाभरात...
नाशिकमध्ये कोथिंबीर प्रतिक्विंटल ९,६००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
गुलटेकडीत शेवगा, मटार, कैरीच्या दरात...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
करंजाड उपबाजारात टोमॅटो लिलावास सुरवातनाशिक : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील उपबाजार...
औरंगाबादेत कोबी १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
नारायणगाव उपबाजारात टोमॅटोची उच्चांकी...नारायणगाव, जि. पुणे   : जुन्नर कृषी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ८०० ते ३५००...नाशिकमध्ये प्रतिक्विंटल १००० ते २२५० रुपये नाशिक...
अकोल्यात मूग सरासरी ४४५० रुपये...अकोला ः गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे...
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...