मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या दरात किंचित सुधारणा
नाशिक : सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांसह सर्वच ठिकाणी कामकाज सुरू होऊन आवक मोठ्या प्रमाणावर वाढली.
नाशिक : सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांसह सर्वच ठिकाणी कामकाज सुरू होऊन आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे कांद्याच्या दरात सरासरी ९०० रुपयांपर्यंत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सलग दुसऱ्या दिवशी आवक घटल्याने दरात काहीशी सुधारणा झाली.
दिवाळीच्या सणानंतर गत सप्ताहात जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाले. काही ठिकाणी सुरू तर काही ठिकाणी कामकाज बंदच होते. कांदा उत्पादकांकडे साठवलेल्या कांद्याची उपलब्धता कमी झाली आहे. तर, प्रतवारीही घटली आहे. त्यामुळे उन्हाळ कांद्यापेक्षा नवीन येत असलेला लाल कांदा भाव खात असल्याचे चित्र आहे.
दिवाळीनंतर सुरू झालेल्या बाजारात पॅनिक सेल होऊन उच्चांकी आवक झाल्याने जिल्ह्यात कांद्याच्या दराला फटका बसला. मात्र शेतकऱ्यांनी ही बाब हेरून आवक कमी केल्याने दरात पुन्हा सुधारणा झाली आहे. जिल्ह्यात हे चित्र सर्वत्र बाजार समित्यांमध्ये आहे.
जिल्ह्यातील प्रमुख पिंपळगाव बाजार समितीत तिपटीने आवक वाढली. तर, लासलगाव येथे दुपटीने आवक वाढली होती. परिणामी, जिल्ह्यात अनेक ठिकाणी लिलाव उशिरापर्यंत सुरू होते. लासलगावमध्ये सोमवारी (ता.२३) १५०२ वाहनांची आवक झाली. तर, मंगळवारी (ता.२४) कमी होऊन ७५८ वाहनांची आवक झाली आहे.
सटाणा बाजार समितीमध्ये सोमवारी आवक वाढल्याने वाहने उभी करण्यासाठी जागा नव्हती. परिणामी काही वाहने कांद्यासह न्यावी लागली. दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी कांद्याच्या विक्रीत नियोजन केल्याने आवक कमी झाली. त्यामुळे पुन्हा दर किंचितशी वाढले आहेत. मनमाड बाजार समितीत मात्र मंगळवारी (ता.२४) आवक वाढल्याचे दिसून आले.
- 1 of 1504
- ››