Agriculture news in Marathi Slight increase in demand for raisins in Sangli, price stable | Agrowon

सांगलीत बेदाणा मागणीत किंचित वाढ, दर स्थिर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे सुरू झाले असून बेदाण्याच्या मागणीत किंचित वाढ झाली आहे. बेदाण्याला सरासरी १४० ते १८५ रुपये प्रति किलो असा दर मिळत असून दर स्थिर आहेत.

सांगली ः गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाण्याचे सौदे सुरू झाले असून बेदाण्याच्या मागणीत किंचित वाढ झाली आहे. बेदाण्याला सरासरी १४० ते १८५ रुपये प्रति किलो असा दर मिळत असून दर स्थिर आहेत. बाजार सुरू झाल्यापासून पंधरा दिवसांत सुमारे ८ ते ९ हजार टन बेदाण्याची विक्री झाली असून महिनाअखेर एकूण १५ ते २० हजार टन बेदाणा विकला जाईल. देशातील बाजारपेठा पूर्ववत येण्यास आठवड्याचा काळ लागणार असून बेदाण्याच्या मागणीत वाढ होईल आणि दर सुद्धा वाढतील, असा अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

बेदाण्याचा बाजार सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहे. गेल्या आठवड्यात बेदाण्याची विक्री ३ ते ४ हजार टन इतकी झाली होती. मात्र, देशासह राज्यातील बाजारपेठा अजून पूर्ववत सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे बेदाण्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली होती. परिणामी बेदाण्याच्या दरात पाच ते दहा रुपयांनी घसरण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. 
दरम्यान, सध्या सण वा उत्सव नसल्याने फारशी मागणी नसली तरी दररोज खाण्यासह बेकरीसाठी बेदाणा विक्री होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून देशासह अन्य ठिकाणीच्या बाजारपेठा हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे बाजारात मागणीत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे दरात पुन्हा प्रति किलोस पाच ते १० रुपयांची वाढ झाली आहे. या आठ दिवसांत ५ ते ६ हजार टनांची विक्री झाली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला तर अडचणी निर्माण होतील. अशी भीती अजूनही शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे सौदे सुरू झाल्यापासून बेदाणा विक्रीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. परंतु मागणी आणि दर याचा अभ्यास करून शेतकरी बेदाणा विक्री करतील, असा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जात असल्याचे दिसते आहे. बाजारपेठेतील बेदाण्याची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे या महिन्याअखेर एकूण १५ ते २० हजार टन बेदाण्याची विक्री होईल.वास्तविक पाहता, एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत बेदाण्याचे सौदे सुरू होते. त्यादरम्यान, बेदाण्याला प्रति किलोस १३० ते २०० असा दर होता. परंतू कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सौदे बंद होते. पंधरा दिवसांपूर्वी सौदे सुरू झाले. त्यादरम्यान प्रति किलोस १३० ते २०० रुपये असा दर होता. मात्र, मागणी कमी झाल्याने दर १४० ते १८५ रुपये असे झाले. अर्थात दर कमी झाले. परंतु दोन महिना असेच दर राहतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.

गेल्या आठवड्यात बेदाण्याच्या मागणीत किंचित घट झाली आहे. बाजारपेठा पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे काही दिवसांत बेदाण्याच्या मागणीत वाढ होईल. सौदे सुरू झाल्यापासून बेदाण्याचे दर स्थिर आहेत.
- अरविंद ठक्कर, 
बेदाणा व्यापारी, सांगली


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...