नागपुरात तुरीत हलकी घट

विदर्भात सर्वदूर देशांतर्गत मागणी वाढल्याच्या परिणामी तुरीच्या दरात तेजी अनुभवली जात होती. आता मात्र तूर दरात हलकी घट झाली आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत देखील तुरीला ६२०० ते ६७०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.
Slight decline in trumpets in Nagpur
Slight decline in trumpets in Nagpur

नागपूर ः विदर्भात सर्वदूर देशांतर्गत मागणी वाढल्याच्या परिणामी तुरीच्या दरात तेजी अनुभवली जात होती. आता मात्र तूर दरात हलकी घट झाली आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत देखील तुरीला ६२०० ते ६७०० रुपये क्विंटल असा दर मिळाला.  

प्रक्रिया उद्योगाकडून तुरीला वाढती मागणी असल्याने तुरीने हमीभावाचा टप्पा ओलांडला होता. जानेवारीत कळमना बाजार समितीत तुरीची तीन हजार क्विंटलची आवक झाली ६००० ते ७००० रुपये या दराने तुरीची व्यवहार होत होते. दरवाढीची शक्यता असताना ते खाली आले आहेत. सध्या तुरीला ६२०० ते ६७२४ रुपये दर मिळत आहे.

आंबिया बहराचा हंगाम संपल्यानंतर मृग बहरातील संत्री बाजारात येत आहेत. आता संत्रा दरात तेजी अनुभवली जात आहे. संत्र्याचे व्यवहार ४५०० ते ५००० रुपये क्‍विंटलने होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. मोठ्या आकाराच्या संत्रा फळांना हा दर मिळत आहे. बाजारातील संत्र्याची आवक २०० क्‍विंटलची आहे. बाजारात मोसंबीची देखील आवक होत असून, त्याचे दर ३१०० ते ३५०० रुपये क्‍विंटलवर पोहोचले आहेत.

बाजारात मोसंबीला जानेवारी २०२१ च्या पहिल्या आठवड्यात २५०० ते ३००० रुपये दर होता. मोसंबीची आवक १००० क्‍विंटलची होती. त्यानंतरच्या काळात मोसंबीचे दर ३००० ते ३८०० रुपयांवर पोहोचले. आता ३१०० ते ३५०० रुपयांवर मोसंबी दर स्थिर आहेत. बाजारात केळीची आवक २२ क्‍विंटलच्या घरात आहे. केळीला कमीत कमी ४५० तर जास्तीत जास्त ५५० रुपये इतका दर मिळत असून हाच दर  स्थिर आहे. द्राक्षाचे व्यवहार ५००० ते ६००० रुपये क्‍विंटलने होत असून, आवक ३९९ क्‍विंटलची आहे.

डाळिंब ६००० ते ८ हजार रुपये क्‍विंटल असून आवक ३४९ क्‍विंटलची होती. बाजारात बटाट्याची आवक ६००० क्‍विंटलवर आहे. भंडारा तसेच लगतच्या मध्य प्रदेशातून बटाटा आवक होते. बटाटा दर ९०० ते १३०० रुपये असे राहिले. बाजारात पांढऱ्या कांद्याची आवक २००० क्‍विंटल आणि दर १००० ते १२०० रुपये होते.

लाल कांदा आवक १३०० आणि दर १००० ते १३०० रुपये मिळाले. बाजारात लसूण आवक सरासरी ३९१८ क्‍विंटल होती. लसणाला १२०० ते ५००० रुपयांचा दर मिळाला. बाजारात टरबूज आवकदेखील होत आहे. ४० क्‍विंटलची आवक आणि दर ५०० ते ६०० रुपये क्‍विंटलचे होते. निंबू आवक दहा क्‍विंटल आणि दर ४००० ते ४५०० रुपये होते.

ज्वारीची आवक कमी बाजारात ज्वारीची अवघी तीन क्‍विंटल आवक होत दर २२०० ते २०० रुपये क्‍विंटल होते. गहू आवक २३४ क्‍विंटल आणि दर १६४२ ते १७६२ रुपये. तांदळाचे दर ५००० ते ५५०० रुपये क्‍विंटल आणि आवक ६० क्‍विंटल होती. हरभरा आवक ३६ क्‍विंटल तर दर ४२५० ते ४८०० रुपये, सोयाबीन आवक ३५ क्‍विंटल आणि दर ५२०० ते ५६२१ रुपये होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com