agriculture news in marathi, slow implementation of enam scheme in market committee, pune, maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी संथगतीने

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

शेतकऱ्यांना ऑनलाइन आणि पारंपरिक लिलावातील फायदे तोटे कळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांचे २५ टक्के डाळिंबाचे लिलाव ऑनलाइन केले जात आहेत. ‘ई-नाम’बाबत शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्याचे काम सध्या सुरू असून, पहिल्यांदा शेतकऱ्यांनी विरोध केला होता. मात्र टप्प्याटप्प्याने ऑनलाइन लिलाव होत असून, सध्या २० ते २५ टक्के ऑनलाइन लिलाव होत आहे. 
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती.

पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन राष्ट्रीय बाजारची (ई-नाम) अंमलजावणी पुणे बाजार समितीत होत नसल्याचे चित्र आहे. पुणे बाजार समितीत पहिल्या टप्प्यात गुळाचा समावेश ‘ई-नाम’ मध्ये करण्यात आला होता. मात्र, व्यापाऱ्यांनी विविध कारणे देत संघटित विरोध करून ही योजना हाणून पाडली. डाळिंबाचा या योजनेत समावेश करण्यात आला, मात्र डाळिंबाच्या एकूण आवकेच्या २५ टक्केच लिलाव ऑनलाइन होत असल्याचा दावा बाजार समितीने केला आहे.

दोन वर्षांपूर्वी केंद्राच्या ई-नाम योजनेत राज्यात पहिल्या दोन टप्प्यांत ६० बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला. ई-नाममध्ये प्रामुख्याने धान्याचे ऑनलाइन लिलाव सुरू करण्यात आले. त्यानंतर गूळ, कांदा आणि डाळिंबाचा समावेश करण्यात आला. 

दुसऱ्या टप्प्यात पुणे बाजार समितीचा समावेश करण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे ऑनलाइन लिलाव करून, त्याला राष्ट्रीय बाजारातील स्पर्धात्मक दर मिळण्याचा हेतू या योजनेचा आहे. पुणे बाजार समितीमध्ये गुळाचा समावेश करण्यात आला. मात्र, गुळाच्या दर्जाचे कारण देत व्यापाऱ्यांनी ऑनलाइन लिलाव करण्यास असमर्थतता दर्शविली. यानंतर डाळिंबाचा समावेश करण्याचे आदेश पणन मंडळाने बाजार समितीला दिले. यासाठी शेतकरी, आडते, खरेदीदारांची नोंदणी देखील करण्यात आली. मात्र अद्यापही डाळिंबाचे ऑनलाइन लिलाव होत नसल्याचे सध्याचे वास्तव आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...