agriculture news in Marathi, slow mechanization of cotton farming, Maharashtra | Agrowon

कापूस शेतीच्या यांत्रिकीकरणाची गती धीमीच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

नागपूर : गेल्या अकरा वर्षांपासून कापूस शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रयत्न सुुरू आहेत. कोट्यवधी रुपये या प्रकल्पावर खर्च झाले असले तरी भारतीय कापूस शेतीला पूरक असणारे कापूस वेचणी यंत्र विकसित करण्यात संशोधन संस्थांना अद्यापही यश आलेले नाही. 

नागपूर : गेल्या अकरा वर्षांपासून कापूस शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे प्रयत्न सुुरू आहेत. कोट्यवधी रुपये या प्रकल्पावर खर्च झाले असले तरी भारतीय कापूस शेतीला पूरक असणारे कापूस वेचणी यंत्र विकसित करण्यात संशोधन संस्थांना अद्यापही यश आलेले नाही. 

राज्यात सुमारे ४१ लाख ३९ हजार हेक्‍टरवर कापूस लागवड असते. सर्वाधिक १६ लाख २५ हजार हेक्‍टर क्षेत्र विदर्भात, त्यानंतर १५ लाख ९० हजार हेक्‍टर मराठवाडा विभागात आणि खानदेश भागात ८ लाख हेक्‍टवर कापूस लागवड होते. सध्या कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता आणि वाढता मजुरी दर या समस्येने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. विदर्भात गेल्या काही वर्षांत कापूस लागवडीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. तर यांत्रिकीकरणासाठी पूरक कापसाच्या जाती भारतात विकसित करण्यात तज्ज्ञांना अजून यश आलेले नाही. 

प्रयत्नांना बसली खीळ
कापूस शेतीच्या यांत्रिकीकरणाचा प्रयत्न डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. साहेबराव बेंडे यांच्या काळात झाला. नागपुरातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेला मिळालेल्या प्रकल्पावर ते काम करत होते. शेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाकडूनदेखील याच प्रकल्पावर काम सुरू होते.

सुरवातीला वेचणीसाठी रोबो तयार करण्यात आला. हा रोबो पांढऱ्या रंगाचा कापूस बोंडातून ओढत होता. पांढऱ्या रंगाच्या वस्तूला ओढणे अशी संगणकीय प्रणाली रोबोमध्ये बसविलेली होती; परंतु या रोबोच्या कार्यपद्धतीवर मर्यादा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तांत्रिक अभ्यास करण्यासाठी विदेशी कापूस वेचणी यंत्र आयात करण्यात आले.

पहिल्यांदा केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत या यंत्राचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर हे यंत्र अकोला कृषी विद्यापीठाकडे संशोधनासाठी पाठविण्यात आले. भारतात फरदड (खोडवा) कपाशी घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यासोबतच एकाच वेळी कापूस तयार होणाऱ्या जाती आपल्याकडे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे आयात केलेल्या यंत्राच्या वापराबाबतही मर्यादा दिसून आल्या.

याच दरम्यान अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतील तज्ज्ञांनी भारतीय बनावटीच्या कॉटन पिकर यंत्राच्या निर्मितीबाबत संशोधन सुरू केले; परंतु अजून या संशोधनाला फारसे समाधानकारक यश हाती आलेले नाही. अकोला कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. साहेबराव भेंडे यांच्या निधनानंतर आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. केशव क्रांती यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर या संशोधनाला फारशी गती राहिलेली नाही. या प्रकल्पावर सुमारे दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे.  

सध्या कोईमत्तूर येथील ‘साउथ इंडियन मिल्स असोसिएशन`ने बॅटरीचलित कापूस वेचणी यंत्र विकसित केले आहे. सात हजार रुपयांना हे यंत्र मिळते. कुशल मजुराच्या मदतीने एका दिवसात एक क्‍विंटल कापूस वेचणी याद्वारे शक्‍य होते, अशी माहिती कापूसतज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी दिली.

मजुराच्या माध्यमातून एका दिवसाला (७ ते ८ तास) सरासरी ५० ते ६० किलो कापूस वेचला जातो. सध्या वेचणीसाठी प्रतिकिलो  ७  ते ८ रुपये आणि शेतातील कापूस कमी होत गेला, तर १० ते ११ रुपयांवर पोचते. राज्याची हेक्‍टरी उत्पादकता ११ क्‍विंटल आहे. तर एकरी ४ क्‍विंटल ४० किलो अशी उत्पादकता येते. कपाशी उत्पादनाचे गणित मांडले, तर १२ ते २५ टक्के रक्कम ही वेचणीवर खर्च झालेलीअसते.


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...