अकोला जिल्ह्यात पूर्वमोसमी कपाशी लागवड गती संथ

अकोला ः जिल्ह्यात दरवर्षी होणारी पूर्वमोसमी कपाशीची लागवड यंदा वाढलेल्या उष्णतेमुळे थोडी उशिराने सुरू होत आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान मागील आठवडाभरापासून सातत्याने ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. यामुळे शेतकरी ही पेरणी करण्यासाठी धजावताना दिसत नाही. जिल्ह्यात असलेल्या १ लाख ५२ हजार हेक्टरपैकी किमान १० टक्क्यांपर्यंत कपाशीची पूर्वमोसमी लागवड होत असते.
Slow pace of pre-season cotton cultivation in Akola district
Slow pace of pre-season cotton cultivation in Akola district

अकोला ः जिल्ह्यात दरवर्षी होणारी पूर्वमोसमी कपाशीची लागवड यंदा वाढलेल्या उष्णतेमुळे थोडी उशिराने सुरू होत आहे. सध्या जिल्ह्याचे तापमान मागील आठवडाभरापासून सातत्याने ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. यामुळे शेतकरी ही पेरणी करण्यासाठी धजावताना दिसत नाही. जिल्ह्यात असलेल्या १ लाख ५२ हजार हेक्टरपैकी किमान १० टक्क्यांपर्यंत कपाशीची पूर्वमोसमी लागवड होत असते.

गेल्या काही वर्षात कापूस लागवडीचे क्षेत्र स्थिरावले आहे. प्रामुख्याने कापसाचे पीक इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना फायदेशीर ठरलेले आहे. यामुळे कपाशीचे दर, विक्री करताना अडचणी असल्या तरी शेतकरी या पिकापासून दुरावलेले नाहीत. दरवर्षी रोहिणी नक्षत्र सुरू होताच शेतकरी साधारणतः २५ मेनंतर मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड केली जात होती. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने प्री-मॉन्सून लागवड करू नये, असे कृषी खात्याने सातत्याने बिंबवल्याने काही शेतकऱ्यांची मानसिकता बदलली.

शेतकरी या लागवडीबाबत सतर्क झाले आहेत. बीटी कपाशीची मॉन्सूनपूर्व लागवड ही उत्पादनासाठी फायदेशीर असल्याचा अनेक शेतकऱ्यांना अनुभव असल्याने शेतकरी ही लागवड प्राधान्याने करतात. जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर या तालुक्यांमध्ये मॉन्सूनपूर्व लागवड क्षेत्र आहे. त्यातही सातपुड्याला लागून असलेल्या अकोट, तेल्हारा तालुक्यात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेने अधिक असते.

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मागील दोन दिवसांपासून कपाशी लागवडीचे काम सुरू केले आहे. तुलनेने हे क्षेत्र कमी असले तरी कपाशी लागवडीचा हंगाम सुरू झाला. तर बहुतांश शेतकरी कपाशी पेरणीसाठी सऱ्या पाडण्याचे, बेड तयार करण्याचे काम सुरू आहे. उष्ण तापमान कमी होताच कपाशी लागवडीचे काम वेगाने सुरू होणार आहे.

यंदा सहा ते सात एकरात लागवडीचे नियोजन आहे. सध्या तापमान कमालीचे वाढलेले आहे. अशा वातावरणात रोपाला सनस्ट्रोक होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे जाणीवपूर्वक पुढील आठवड्यात पेरणी करीत आहे. दोन दिवसांनी लागवडीचे काम सुरू करणार आहोत. तयारी करून ठेवलेली आहे. - विजय इंगळे, कापूस उत्पादक शेतकरी, चितलवाडी जि. अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com