Agriculture news in marathi, Slowly sowing rabbis in Kolhapur district | Agrowon

कोल्हापूर जिल्ह्यात वाफशाअभावी रब्बी पेरण्या संथपणे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसाचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. हा हंगाम लांबणीवर पडणार आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला, तरी अद्यापही खरीप पिकांची कापणीच सुरू आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम किमान महिनाभर उशिरा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पूर्व भागातील काही भागांचा अपवाद वगळता पश्‍चिमेकडील भागात अद्यापही रब्बीच्या हालचाली सुरू झाल्या नसल्याची स्थिती आहे. 

कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसाचा परिणाम रब्बी हंगामावर होणार आहे. हा हंगाम लांबणीवर पडणार आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला, तरी अद्यापही खरीप पिकांची कापणीच सुरू आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम किमान महिनाभर उशिरा सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पूर्व भागातील काही भागांचा अपवाद वगळता पश्‍चिमेकडील भागात अद्यापही रब्बीच्या हालचाली सुरू झाल्या नसल्याची स्थिती आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. पंधरा दिवस सातत्याने पाऊस झाल्याने परिपक्व झालेल्या भाताची खाचरे अद्यापही पाण्यात आहेत. अनेक ठिकाणी भात पक्व होऊन आडवे होत असल्याने शेतकरी कच्च्या वाफशातच शक्‍य तितका भात मळणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे आणखी पंधर दिवस तरी भाताची मळणी पूर्ण होइल. त्यानंतरच रब्बीकडे शेतकरी वळेल, असे चित्र आहे. खरीप हंगाम लांबल्याने आता याचा परिणाम ज्वारी, गहू, मका या पिकांच्या पेरणीवर होणार आहे. रब्बी हंगामात साधारणत तीस हजार हेक्‍टर क्षेत्रावर पिकांचे उद्दिष्ट आहे. 

आत्तापर्यंत केवळ पाच टक्क्‍यांपर्यंत रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. वाफसा स्थिती नसणे हेच एकमेव कारण रब्बीच्या पेरण्या लांबण्यावर झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. सध्या पहिले आव्हान वाफसा स्थिती आणण्याचे असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जो भाग उंचावर आहे, ज्या भागातील खरीप कापणी संपली आहे, अशा ठिकाणी शेतकरी रब्बीची मशागत करून पेरणी करण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, अद्याप म्हणावी तशी गती येत नसल्याने परत पाऊस न झाल्यास येत्या पंधरा दिवसांत रब्बीच्या पेरण्या वेगात सुरू होतील, असा अंदाज आहे. सध्या ऐन रब्बी हंगामात खरीप काढणीतच शेतकरी गुंतला असल्याचे चित्र आहे.


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...