agriculture news in marathi, Small businesses men will get income by the 'Wallet' of Mahavitaran | Agrowon

लहान व्यावसायिकांना मिळणार महावितरणच्या ‘वॉलेट’द्वारे उत्पन्न
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जुलै 2019

सोलापूर : महावितरणने वीजबिल भरण्यासाठी ‘वॉलेट’द्वारे रोजगाराची संधी निर्माण केली आहे. ‘वॉलेट’द्वारे वीजबिलांचा भरणा केल्यास प्रतिपावतीमागे ५ रुपये कमिशन देण्यात येईल. छोट्या व्यावसायिकांना या ‘वॉलेट’द्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सोलापूर : महावितरणने वीजबिल भरण्यासाठी ‘वॉलेट’द्वारे रोजगाराची संधी निर्माण केली आहे. ‘वॉलेट’द्वारे वीजबिलांचा भरणा केल्यास प्रतिपावतीमागे ५ रुपये कमिशन देण्यात येईल. छोट्या व्यावसायिकांना या ‘वॉलेट’द्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

महावितरणतर्फे वीजबिलांचा भरणा करण्यासाठी मोबाईल अॅपसह आॅनलाइन सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता महावितरणने स्वतःचे पेमेंट ‘वॉलेट’ आणले आहे. त्याद्वारे वीजग्राहकांना स्वतःचे वीजबिल भरता येईल. त्याचप्रमाणे बचत गट, किराणा दुकानदार आदी छोटे-मोठे व्यावसायिक, महावितरणचे वीजबिल वाटप व रीडिंग घेणाऱ्या संस्थांना या ‘वॉलेट’द्वारे ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून उत्पन्न मिळविता येईल.

‘वॉलेट’ नोंदणीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज उपलब्ध आहेत. त्यानंतर संबंधित उपविभाग कार्यालयाकडून अर्जदारांच्या अर्जांची व जागेची पडताळणी करण्यात येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. ‘वॉलेट’धारकाने प्रथम कमीत कमी ५ हजार रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर १ हजार रुपयांच्या पटीत रिचार्ज वाढविता येईल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंगद्वारे रिचार्जची सोय उपलब्ध आहे. 

रिचार्ज केल्यानंतर ‘वॉलेट’ अॅपद्वारे महावितरणच्या वीजग्राहकांकडून वीजबिलांची वसुली करता येईल. वीजबिलांचा भरणा केल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश पाठविला जाईल. विशेष म्हणजे, एका ‘वॉलेट’मधील शिल्लक रक्कम वापरून सबवॉलेटद्वारे एकापेक्षा अधिक व्यक्ती ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करू शकतील. अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

इतर बातम्या
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून...नाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...