नाशिक जिल्ह्यातील बंधारे होणार दुरुस्त

या योजनेअंतर्गत गाळ मोफत मिळणार असल्याने जामिनीची सुपीकता वाढीस लागेल. रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीचा कस कमी झाल्याच्या समस्येवर मात करता येईल. महसूल विभागाने याबाबत व्यापक जनजागृती करावी. - किशोर वाघ, शेतकरी, टेंभे वरचे दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे. साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होईल. - प्रवीण महाजन, उपविभागीय अधिकारी, बागलाण
नाशिक जिल्ह्यातील बंधारे होणार दुरुस्त
नाशिक जिल्ह्यातील बंधारे होणार दुरुस्त

नाशिक : भविष्यात दुष्काळाची झळ बसू नये, यासाठी ''गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना'' महसूल विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविण्याचे धोरण महसूल विभागाने ठरविले आहे. आठ तालुक्यांतील १४२ गावांत १७० ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचे नियोजन आहे. बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा ७१ हजार ८१५ शेतकरी आणि २२ हजार २८९ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल, असा प्रशासकीय यंत्रणेचा अंदाज आहे. 

 या उपक्रमात अनुलोम, टाटा ट्रस्ट  आणि युवामित्र यांसारख्या सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. यंदा जिल्हयात १९७२ पेक्षाही कठीण परिस्थितीचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. शासनाने बागलाण, मालेगाव, देवळा, चांदवड, सिन्नर, नाशिक, इगतपुरी, नांदगाव या आठ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. गाळमुक्त धरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्येे स्वखर्चाने गाळ वाहून नेणे अत्यावश्यक आहे. यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च शासनाकडून, सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीमधून करण्यात येणार आहे. 

या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे जीओ टॅगिंग, योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलित करणे आदी कार्यवाही करण्यात येईल. २५० हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व ५ वर्षांपेक्षा जुन्या तलावांना प्राधान्यक्रम राहील. केवळ गाळउपसा करण्यास परवानगी राहील. वाळू उत्खननास पूर्णतः बंदी असेल.

दृष्टिक्षेपात गाळमुक्त धरण योजना 

  • गेल्या वर्षाची स्थिती (२०१७/१८ )  
  • योजनेअंतर्गत झालेली कामे : ७६७ 
  • धरणातून काढलेला गाळ : ३६ लाख        २१ हजार ३३४ घनमीटर 
  • लाभार्थी शेतकरी : २ हजार ७५६  
  • योजनेवरील खर्च : साडेनऊ कोटी रुपये.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com