कोल्हापुरातील छोटे प्रकल्प भरू लागले

कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे छोटे प्रकल्प भरण्यास प्रारंभ झाला आहे. गुरुवारी (ता. ९) पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरूच होती. जांबरे (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे.
Small projects in Kolhapur started filling up
Small projects in Kolhapur started filling up

कोल्हापूर :  जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे छोटे प्रकल्प भरण्यास प्रारंभ झाला आहे. गुरुवारी (ता. ९) पश्चिम भागात पावसाची रिपरिप सुरूच होती. जांबरे (ता. चंदगड) मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे.

कोकण सीमेवरील फाटकवाडी आणि जांबरे हे दोन्ही प्रकल्प पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भरतात. या वर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फाटकवाडी प्रकल्प भरला. त्या पाठोपाठ मंगळवारी (ता. ७) मध्यरात्री जांबरे प्रकल्पही भरला. त्यामुळे सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे.

कासारी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पडण्याऱ्या मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले आहे. भात रोप लावण करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. यवलूज व कसबा ठाणे बंधारे पाण्याखाली आहेत. गगनबावडा तालुक्यात अणदूर बंधारा पहिल्यांदा पाण्याखाली गेला. कुंभी, रुपणी, धामणी, सरस्वती नद्या दुथडी वाहत आहेत. कोदे, अणदूर, वेसरफ हे लघुप्रकल्प यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्प क्षमतेच्या ५१ टक्‍के भरला आहे. कुंभी धरणातून ३५० क्‍युसेक, तर कोदे धरणाच्या सांडव्यावरून ६३१ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. धरणातून वीजनिर्मितीसाठी ८१५ क्‍युसेक विसर्ग सुरू ठेवला आहे. ३४.४० टीएमसी साठवण क्षमता असणारे धरण ३६.९८ टक्के भरले आहे. गेल्या २४ तासांत ५२, तर एकूण ७२८ मि.मी. पाऊस झाला. कानसा, वारणा नदींची पाणी पातळी वाढली आहे. रेठरे-कोकरुड दरम्यानचा वारणा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com