Agriculture news in marathi small rain in Solapur district, no heavy rain | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीच

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

सोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली. मात्र, भिज पाऊस होत आहे.

सोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली. मात्र, भिज पाऊस होत आहे. त्यामध्ये जोर मात्र कसलाच नाही. शुक्रवारी (ता.१४) पहाटेही काही ठिकाणी पावसाने हलकी हजेरी लावली. पण. नंतर दिवसभर कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण राहिले. 

शुक्रवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ आहे. अनेक भागात सूर्यदर्शनही उशिरा झाले. माळशिरस, माढा, मोहोळ, बार्शी, करमाळा भागात असा सर्वदूर बुधवारपासून पाऊस होतो आहे. दिवसभर कधी ऊन, कधी ढगाळ असे वातावरण राहते आहे. त्यानंतर सायंकाळी मात्र पाऊस हमखास हजेरी लावतो आहे. शुक्रवारीही दिवसभर पुन्हा काहीशी अशीच स्थिती होती. तत्पूर्वी पहाटे काही भागात मात्र पावसाने हलकी हजेरी लावली. 

जिल्ह्यात पावसाने यंदा वेळेवर हजेरी लावली. जून आणि जुलैमध्येही पावसाने सातत्य ठेवले. त्यामुळे यंदा पहिल्यांदाच पावसाने या दोन्ही महिन्यांची सरासरी गाठली. आता ऑगस्टमध्ये मात्र त्याने काहीशी विश्रांती घेतली होती. पण, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा सुरुवात केली आहे. पण, त्यात फारसा जोर नाही. केवळ भिज पाऊस होतो आहे. खरिपातील तूर, मूग, सोयाबीन, उडीद या पिकांना हा पाऊस पोषक मानला जातो आहे. त्यामुळे यंदा खरीपातील पिके उत्तम स्थितीत आहेत.

उजनीची पाणीपातळी ३२.२९ टक्के

उजनी धरणातील पाणलोट क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या पावसामुळे वरच्या धरणातील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. शुक्रवारी दौंडकडून १३ हजार ५८५ क्युसेक इतका विसर्ग उजनी धरणात येत होता. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी धरणातील एकूण पातळी ४९३.२६५ मीटरपर्यंत होती. तर, एकूण पाणीसाठा ८०.९६ टीएमसी, तर त्यापैकी उपयुक्त साठा १७.३० टीएमसी इतका होता. तर, पाण्याची पातळी ३२.२९ टक्केपर्यंत होती.


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...