खरेदी केंद्रावरील सोयाबीन विक्रीला अल्प प्रतिसाद

खरेदी केंद्रावरील सोयाबीन विक्रीला अल्प प्रतिसाद
खरेदी केंद्रावरील सोयाबीन विक्रीला अल्प प्रतिसाद

अकोला : अाधारभूत किमतीने शेतमाल खरेदी व्हावा, यासाठी दरवर्षी खरेदी केंद्रावर दिसणारी गर्दी यंदा मात्र दिसून येत नाही. शेतकऱ्यांनी अचानकपणे या खरेदी प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. शासकीय खरेदीची वाटचाल कापूस खरेदीच्या वाटेवर सुरू झाल्याच्या प्रतिक्रियासुद्धा उमटत अाहेत. मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी प्रक्रीया सध्या सुरू आहे.

नावनोंदणीसाठी वारंवार मुदतवाढ देण्यात अाली. शिवाय दुसरीकडे खरेदीसुद्धा केली जात अाहे. या हंगामात सोयाबीन विक्रीसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने नावनोंदणी केली. मात्र सोयाबीनची खरेदी अत्यल्प झाली. कारण सोयाबीनला खुल्या बाजारात हमीभावाइतकेच दर मिळत अाहेत. शासनाने मूग, उडीद, सोयाबीनच्या आॅनलाइन नोंदणीचे निर्देश दिले. त्यानंतर खऱेदी प्रक्रिया सुरू झाली. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता.२२) सुरु केलेल्या आठही केंद्रांवर केवळ सहा शेतकऱ्यांनी ७१ क्विंटल सोयाबीन विक्री केले.

शासनातर्फे जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, वाडेगाव, पातूर, बार्शीटाकळी, पारस, अकोला व मूर्तिजापूर या केंद्रावर खरेदी सुरू आहे. अातापर्यंत अकोटमध्ये १५१९, तेल्हारा १०६१, वाडेगाव १४०९, पातूर ८४६, बार्शीटाकळी १४०९, पारस ११९, अकोला २१४० व मूर्तिजापूर केंद्रावर २४२४ इतक्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. सोयाबीन पाठोपाठ जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रांवर मूग, उडिदाच्या खरेदीची स्थिती तशीच अाहे. आजवर मुगाची ६७०० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नावनोंदणी केली. त्यापैकी केवळ १०९६ शेतकऱ्यांच्या ६९३६ क्विंटल मुगाची प्रत्यक्ष खरेदी झाली. तसेच उडिदसाठी ८३५६ शेतकऱ्यांची नोंदणी आहे. त्यापैकी ५०७ शेतकऱ्यांकडून २६७८ क्विंटलची खरेदी करण्यात अाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com