Agriculture news in Marathi Small traders neglect fish farming in Ratnagiri | Agrowon

रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांचे दुर्लक्ष

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसते.

रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसते. जिल्ह्यातील ४१ तलावांच्या लिलावातून वर्षाला सुमारे आठ लाखांचे उत्पन्न मत्स्य विभागाला मिळते. मात्र, मत्स्य बीज तयार न होते, तलावात सूक्ष्म खाद्य तयार न होणे, मागणी नसणे आणि मासे पकडण्यासाठी कामागार न मिळणे, अशा अनेक अडचणींमुळे गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला उतरती कळा लागली आहे. यंदा फक्त २३ तलावांचा लिलाव होऊन पावणे चार लाखांच्या महसुलावर समाधान मानावे लागले आहे.  

जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा असल्याने खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाला जिल्ह्यात मोठी मागणी आहे. तरी पश्‍चिम महाराष्ट्रात चालणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीचा चांगला प्रयोग जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे मत्स्य विभागाच्या ताब्यात असलेल्या ४१ तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जात होते.

त्यामध्ये त्यामध्ये कटला, कोळंबी, रोह आदी प्रकारची मत्स्य शेती घेतली जाते. हेक्टरी ३०० रुपये या प्रमाणे तलावाचा लिलाव होतो. सुमारे १०० ते १२० हेक्टरचे तलाव आहे. लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यावसायिक त्यामध्ये माशाचे बीज सोडले जाते. मात्र, बहुतेक तलाव हे सह्याद्रीच्या पायथ्याशी आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतरही काही महिने या भागातील दऱ्या खोऱ्यातील पाणी वाहत राहते. यामुळे तलाव भरून उलटून वाहत राहत. त्यामुळे बहुतांशी पिल्लं वाहून जातात. तसेच जांभ्या दगडामध्ये सर्व तलाव आहेत. यामध्ये माशांना आवश्यक असणारे सूक्ष्म खाद्य तयार होत नाही. माशांना पोषक वातावरण मिळत नसल्याने मत्स्य उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादन घटते. गोड्या पाण्यातील मासे पकडण्यासाठी कामगार मिळत नाहीत. गोड्या पाण्यातील माशांना खाऱ्या पाण्यातील माशांप्रमाणे चव लागत नाही. काटे भरपूर असल्याने त्याची मागणी
अल्प आहे.

गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीपुढे अशी अनेक संकट आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये तलावातील मत्स्य शेतीकडे व्यावसायिकांनी पाठ फिरवली आहे. यंदा फक्त २३ तलावांचाच लिलाव झाला आहे. यातून मत्स्य खात्याला पावणे चार राख महसूल मिळाला आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला उभारी देण्यासाठी आता प्रयोगशील व्यावसायिकाची गरज आहे. तरच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय वाढीला लागणार आहे. अन्यथा हा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे.


इतर ताज्या घडामोडी
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...